Saturday 26 April 2014

आनंदवनातल्या प्रकाशवाटा भाग 4


प्रकल्पावर आलो तेव्हा जेवायला अजून अवकाश होता म्हणून आम्ही रूम वर आलो. दिवसभराचे फोटो बघत होतो तोच कानावर गाण्यांचा आवाज पडला "इतनी शक्ती हमे दे न दाता …… ".  वसतीगृहातील मुली त्यांचा रोजचा सवयी प्रमाणे संध्याकाळी प्राथना म्हणत होत्या. गाण्याचा सूर ऐकून मी आणी रुपेश पळत पळतच वासातीगृहापाशी पोहोचलो. सगळ्या मुली एकसुरात च प्राथना म्हणत होत्या. त्यांनी माडिया भाषेतही काही गाणी म्हटली ते काही कळले नाही पण ऐकायला बरे वाटले.  प्रत्येक प्राथाने नंतर १/१ मुलगी उठून आजच दिनविशेष आणी ठळक बातम्या सांगत होत्या. हे सगळ बघून शाळेतले दिवस आठवले. एक छान संध्याकाळ गेल्याचा आनंदात आम्ही जेवलो आणि झोपलो. उद्या जगन्नाथ भाऊ आणी विलास मनोहर जे प्रकल्पाचा अगदी सुरुवाती पासून होते ते माहिती देणार होते. रात्री झोपताना विधार्भाच्या गर्मी ने थोडा (जरा जास्तच …) त्रास दिला;






सकाळी सकाळी आमचा रूमचा समोरच असणाऱ्या बदकांच्या आवाजामुळे जाग आली. रूम समोरच बदकांसाठी तळे केले होते. त्यात ही बदक दिवसभर खेळत बसायची. सकाळच्या थंड हवेत आणि कोबड्या ऐवजी बदकांच्या आवाजाने आम्ही उठलो. आवरून आम्ही बाहेर शाळेच्या पटांगण वर आलो. तीथे शाळेचे मूल मुली warmup excersize करत होते. त्यांना बघून मी आणी रुपेशनेही single आणी double Barr वर हाथ आजमावला. त्यांना बघून आम्हालाही जोश आला होता पण नाश्त्याची वेळ झालेली म्हणून आवरत घेतलं. 


Charming girls


Warmup Session



जगन्नाथ भाऊ आमची वाटच बघत होते. आमचा बरोबर आता मुंबईचा senior citizen चा एक group पण join झाला. त्यांचा बरोबर प्रकल्पाची पुन्हा एकदा वारी झाली. त्यांनी अगदी सुरुवाती पासून माहिती दिली.  आदिवासींचे राहणीमान, त्यांचा श्रद्धा अंधश्रद्धा, बाबांनी येथे येण्या मागच कारण, सुरुवातीला भेडसावले ले प्रश्न, आताची परिस्थिती.



Jagannath Bhau Addressing.



School

Botul

Vilas Manohar( writer of Negal)







Words by जगनाथ भाऊ :


  • येथील आदिवासींमध्ये लग्न समारंभात मुली कडच्या ना जास्त मान असतो. इथे स्त्रीप्रधान संस्कृती आहे. चला निदान आदिवासिमध्ये तरी स्त्री चे महत्व आहे. आपल्या शहरी लोकांना केव्हा समजेल देवजाणे. 
  • इथे दरवर्षी Switzerland हून doctor चा एक group येतो. आणी आदिवास्यांवर critical operations करतात अगदी मोफत. 
  • आदिवास्यांकडे काही ठेवायला नसल्यामुळे त्यांचा medical record hospital मधूनच maintain केला जातो. इथे प्रत्येक गावांच्या नावाने box बनवून त्यात त्या गावातून येणाऱ्या माणसाचा paper alphabetical order ने ठेवला जातो. अशाप्रकारे इथे २०० हून अधिक गावांचा record आहे. 
  • पहिले शिकायला तयार नसणारी हि मुले आता इथल्या शाळां न house full चा board लावावा लागतो. आता कुठे बदलाचे वारे फिरायला लागले आहे. 
  • भाऊंनी आम्हाला एक जागा दाखवली त्याला "बोटुल" अस काहीतरी म्हणतात, हे आदिवासींचे समाज मंदिर आहे.  इथे गावातील सगळे सामाजिक कार्यक्रम व बैठका होतत. अगदी लग्न कार्या पासून ते उत्सवा पर्यंत. 

 आमटेंचे प्राणीमात्र :

अनिकेत दादा आमची वाट बघत होता. त्याने सगळ्यांशी चर्चा करून नंतर प्राणी दाखवायला नेले. इथे आदिवासी जेवण्यात कोणताही प्राणी खायचे. त्यामुळे या भागात शिकारीचे प्रमाण जास्त होते. हे थांबवण्यासाठी आमटे नी त्यांना शेती करायला शिकविले. आणि जखमी आणी प्राण्याचा बछड्या ना स्वतः सोबत ठेवले.  भरपूर शे प्राणी हे अगदी जन्मा पासून इथेच आहे. ते यांचा मुलांबरोबरच वाढलेत. प्रकाश दादांची आणि प्राण्यांची एव्हडी मैत्री आहे हे आता पर्यंत ऐकले होते आता प्रत्यक्ष पाहत होतो. आमटेंचे लहान मुल तर त्यांचा सोबत खेळतात. असो इथे हरीण, सांबर, मगर, मोर, अजगर, धामण, घुबड, शेकरू, अस्वल, सालीन्द्री  आणि बिबट्या असे सर्व प्रकारचे प्राणी आहेत. अनिकेत दादा ज्या सराईत पणे बिबट्या बरोबर होता ते पाहून थक्कच झालो. पिंजर्याचा दरवाजा जसा उघडला तसा बिबट्या बाहेर आला आणी अनिकेत ला चाटू लागला. 











आता परत फिरण्याची वेळ आली होती. This journey is never ending.
तिथून निघालो ते आनंदवन आणी लोक बिरादरी प्रकल्पाच्या छान आठवणी घेऊन आणी आमटे family आणी त्यांचा कामाला salute करून. 

आता  Next  ताडोबा …….    



भाग   भाग   भाग   continue …।

आनंदवनातल्या प्रकाशवाटा भाग 3


Travel To Lok Biradari Prakalp:

दुसर्या दिवशी सकाळी सकाळीच आमची गाडी हेमलकसा कडे निघाली. चंद्रपूर पर्यंत state highway आहे. Highway वरून गाडी चांगली सुसाट निघाली होति. सकाळ असल्यामुळे खिडकीतून छान थंड हवा येत होति. नुकताच सूर्योदय झाला होत. त्या सुर्यानारायाना कडे बघून विधार्भातील गरमीची आठवण झाली आणि सकाळचा तो थंड वारा जास्तच हवाहवासा वाटू लागला. वाटेत एका ठिकाणी जुमडे काकांनी गाडी नाष्ट्या साठी side ला घेतली. तीथे सगळ्यांनी १/१ plate पोहे टाकले. इकडे पोह्यांचा सोबतीला मठ्ठा होता. What a combination? वाटेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा boundary वर वैनगंगा नदी लागते. पात्र प्रचंड मोठ होत आणि पाणी एकदम crystal clear. छान view होता तो. गाढचीरोली मध्ये entry केल्यावर येथील नक्षलवादावर अनेक news ऐकल्या होत्या. पण जुमडे काकांचा बोलण्या प्रमाणे काही problem नव्हता. वाटेत १/२ गावात CRPF चे जवान तैनात होते. रस्त्यात जुमडे काकांना त्यांचा बाबा आमटे आणि तेथील experience विचारला. ते ४० वर्षा पासून आनंदवनात कार्यकर्ता म्हणून काम करायचे. त्यांचाशी बोलून मनात म्हटलं बर झाल आश्रामातालाच driver केला, तेवढीच जास्त माहिती भेटते. जस जस हेमलकसा जवळ पोहोचत होतो तस जंगल जास्तच घनदाट होत होत. हे जंगल पूर्ण पणे सागाच्या आणि बिडीच्या पानांच्या झाडाचे आहे. त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड होते. ह्या जंगलात मोहाची झाड पण भरपूर प्रमाणात आहेत. मोहाचा फुलापासून दारू बनवतात. येथील आदिवासी या फुलांची विक्री करतात. रस्त्याने जागोजागी मोहाच्या फुलांचा सडा पडला होता. दारू साठी प्रसिद्ध असलेली हि फुले आम्ही पण जरा taste करून बघितली. 


 Mohache phul.








चंद्रपूर नंतर आलापल्ली हेच एक मोठ गाव. इकडचा घरांसाठी लाकडांचा जास्त प्रमाणात वापर होतो. मस्त शेणाने सरावलेले घर,त्याला लाकडाचे छप्पर आणि लाकडाचीच बनवलेली compound. अशी घर मस्त दिसतात. अल्लापल्ली नंतर एक नदीचा पूल लागतो. आता हा पूल बांधलेला आहे पण आधीचा काळात पूल नव्हता तेव्हा पावसाळ्यात हेमाल्कासाचा संपर्क तुटायचा. या साठी पुलाच्या अलीकडच्या पाड्यात हेमाल्कासाचा एक छोटासाच आश्रम तयार केला होता. त्याचा वापर संपर्क तुटलेल्या काळात राहण्यासाठी आणी समान ठेवण्या साठी करायचे. 

११ वाजेच्या सुमारास आम्ही हेमाल्कासास पोहोचलो. Gate मधून आत गेल्यावर लगेच डाव्या हाताला तपासणी साठी आलेले माडिया गोंड आदिवासी होते. आत गेल्यावर पहिले सचिन ला भेटलो. त्याने आम्हाला रूम दाखवल्या आणि १२ वाजता बेल वाजल्यावर जेवायला कुठे यायचे ते सांगितले. आमचा रूम चा बाजूलाच प्रकाश आमटे यांचा बिबट्या होता. प्रकाश दादाचं प्राणीप्रेम तर सगळ्यांना माहितच आहे. पण आम्ही बिबट्याला पिंजर्यातून च पहिले. बेल वाजली तस आम्ही जेवायला गेलो. Mr. & Mrs. दिगंत आमटे आमचा सोबतच जेवायला बसले. येथील एक पद्धत छान होती.  सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी जेवण बनते. आणि स्वावलंबी पणा इथेही दिसतो. जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापली ताट वाटी स्वतः धून ठेवायची. गरम जास्त होत असल्यामुळे सचिन दादा आम्हाला दुपारून प्रकल्प दाखवणार होता. आम्हीही प्रवासाचा शीण काढण्यासाठी थोडावेळ आराम केला. दुपारून साचीने संपूर्ण प्रकल्प दाखवला. 
 
 sachin explaining the project.











हेमलकसा बद्दल थोडेसे :

गाढचीरोली मधील भामरागड भागात राहणारी माडिया  आणि गोंड हि सर्वात मागास जमात. प्रवाह पासून तुटलेलेशिक्षणाचा काही गंध नसलेले, घालायला कपडे नसलेले असे हे आदिवासी. त्यांचा आणि प्राण्यांचा राहण्यात काहीच फरक नव्हता. इथे रोगराई प्रचंड प्रमाणात होती. त्यांची परिस्थिती बघून बाबांना या ठिकाणी काम करावेसे वाटले; या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी प्रकाश आमटे यांनी सांभाळली. कपडे घातलेल्या माणसापासून दूर पाळणाऱ्या या लोकांना आपलेसे करण्यात प्रकाश दादाचा मोलाचा वाटा आहे. येथे त्यांचा आरोग्य सेवे सोबतच त्यांना शिक्षणही दिले जाते. त्या साठी आदिवासी मुला मुलींसाठी शाळा व वसतीगृहे आहेत. महत्वाची बाब म्हणजे येथून शिकलेले काही विद्यार्थी doctor आणी engineer झालेत. काही विद्यार्थी sports मध्ये state आणि nationals पर्यंत पोहोचलेत. 

प्रकल्पा पाठीमागेच ३ नद्यांचा संगम आहे. प्रकल्प बघून झाला होता आणी संध्याकाळची वेळ होती. हीच वेळ साधून आम्ही संगमावर गेलो. भामरागड हे महाराष्ट्राचा boundary वर आहे. संगमापाशी आंध्रप्रदेश आणी छत्तीसगढ राज्यांचा सीमा येतात. संगमाच ठिकाण मोठ आहे. भामरागड area त प्रदूषण नसल्यामुळे नद्यांच पाणी एकदम स्वच्छ आणी पारदर्शक आहे. नद्या उथळ असल्यामुळे आम्ही पाण्यात गेलो. 


Me @ Sangam



 We All looking @ sunset.









 


With Jumade Kaka

On the Sangam bank



 Transport through river.







सूर्यास्ताची वेळ होत चालली होती. सोनेरी सूर्यप्रकाशात पाणी आणी नदीपात्रातील रेती चमकून निघाली होती. नदी पात्र खडकाळ आहे. आम्ही दगडा दगडा वरून संगमाच्या मध्यभागी गेलो. तीथून तिन्ही बाजूचा प्रदेश बघता येत होता. फोटोग्राफीसाठी मस्त जागा होती ती. शहरी कोलाहाला पासून दूर जंगलात आमटेंच्या सानिध्यात बघितलेला हा सूर्यास्त अवर्णनीय आहे. नदी पात्रा पाशी झाडा जवळ एक बसण्यासाठी जागा आहे. तीथे बसून हा निसर्गाचा आनंद लुटण्यात काही औरच मजा आहे. तीथे थोड फोटो session झाल्यावर जुमडे काका आम्हाला भामरागड शासकीय विश्रामालाया जवळ दुसर्या नदी पात्रा जवळ घेऊन गेले. तीथे गावात काम करणाऱ्या छातीस्गढ मधील लोकांची परत त्यांचा राज्यात जायची लगबग सुरु होती. एका छोट्या नावेतून ही मंडळी आपापल्या साइकलि पलीकडे वाहून नेत होती. तीथे थोडावेळ घालवल्यावर आम्ही सुद्धा परतीचा प्रवासाला निघालो. 



भाग   भाग   भाग ४  continue …।

आनंदवनातल्या प्रकाशवाटा भाग 2


आनंदवन बद्दल थोडेसे : Forest Of Joy

बाबांनी एका झोपडी पासून सुरुवात केलेले आनंदवन आज एक ग्रामपंचायत आहे. त्याचा आवाका फार मोठा आहे. सुरुवातीला दंडकारण्य असलेली हि जमीन आज पूर्ण लागवडी खाली आहे. येथील बाबांचे काम आणी त्याला Dr.विकास आमटे यांनी ज्या प्राकारे पूढे नेले आहे हे बघून आपण किती नगण्य आहोत याची जाणीव होते. बाबांनी येथे कुष्ठरोग्यांची सेवाच नाही तर त्यांचा उद्धार करून त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आनले. बाबांनी त्यांचावर स्वावलंबत्व बिंबवले आहे. बाबा नेहमीच म्हणतात "Give Them Chance, Not Charity....."




Raman kuti.


 

प्रभू काकांनी आमची राहायची व्यवस्था रमण कुटीत केलेली.  रमण कुटीतील व्यवस्था उत्तम आणी नेटकी होति. आम्ही आवरले आणी प्रकल्प बघायला नीघालो. येथील परांजपे काकांनी आम्हाला संपूर्ण प्रकल्प समजून सांगीतला. इथे संधीनिकेतन, workshop, हातमाग आदी ठिकाणी अंध, अपंग, कुष्ठरोगी काम करतात. प्रत्येक माणूस हा कलाकार असतो हे येथील लोकांनी केलेल्या greeting cards आणी wall frames वरून कलते. आनंदवनचा स्वताचा "स्वरानंद" नावाचा program आहे ज्यात अंध, अपंग मुले dance करतात, instrument वाजवतात, गातात अगदी कोणत्याही सामान्य माणसाच्या तोडीचे.

 man behind all greeting cards & wall frames. He was leprosy patient.
 Wall frame made from wood pick.
 Leprosy patient creating thread.




 Blind n leprosy person creating khadi clothe








 making of greetings from tree wood.







इथे शंकुतला आहे जी अपंग असल्यामुळे तीचे सगळे काम पायाने करते. ती इथे अतीशय सुंदर greeting बनवते जे ती स्वतः पायाने विनते. What impossible to me by hand? she is doing by her foot. Isn't it amazing!!! 



 me with shakuntala.






SHAKUNTALA- The Girl with great Smile.....
At Anandwan, Everyone knows Shakuntala. She is the girl with always smiling face. Being a victim of Cerebral palsy by birth, she can not talk,walk or use her hand. You see the beautifully threaded greeting cards that she stitches using only her toes.
सोबतीला परांजपे काका सुरुवातीचा काळातील प्रसंग सोबत होते.

जेवण झाल्यावर दुपारून परांजपे काकांनी आम्हाला बाबा  आणी साधना ताई चा समाधी कडे घेऊन गेले. अतीशय निस्वार्थी असलेल्या या माणसाला आपल्या मृत्युनंतर हि काही नको होते. त्यांचा इच्छे प्रमाणे त्यांना फक्त केळीचा पानात लपेटून जमीनीत पुरण्यात आले. बाबांचा समाधीचा परिसर देखणा आहे. संपूर्ण आनंदवनाचा परिसराच एकंदरीत नेटका आहे. प्रत्येक ठिकाणी कोणी न कोणी सतत साफ सफाई करत होते. 

 Anandwan's holy place


Cleanliness.


We learned that in Anandwan a tree is planted whenever someone is buried- This way people continue to have there friends & relatives, reborn as Trees. And at the same time it helps save the environment.
It is interesting to note that both, Baba & Tai, passed away on a Saturday on the ninth day of month. It was Tai's wish to be buried right next to her husband; Her wish was fulfilled when she passed away exactly 3 years & 5 moths after Baba.
They were together before death & now even afterwards..... For Eternity!!!!

परांजपे काकांनी आम्हाला Bio-Gas plant दाखवला. Bio-Gas plant, which is unique feature of Ananndwan. The plant is build & design by Dr. Vikas Amte. Until my visit, I didn't know aware that Anandwan has the largest Bio-Gas plant in India. and I also didn't know that Dr. Vikas Amte is the Bio-Gas plant advisory for the government of India!!!  

प्रकल्प बघीतल्यावर संध्याकाळी विकास आमटे नी आमची ओळख करून घेऊन मनमोकळा संवाद सधला. त्यांचा एक विचार अजून मला आठवतो "आनंदवन हे फक्त बाबांचं नसून हे येथील महारोग्यांच आहे. इथे येताना बाबांचं काम बघण्यापेक्षा समाजाने झिडकारले ली मनसे काय काय करू शकतात हे बघा." As Baba said "Give them Chance, not charity!!!  Demonstrate your strength, not weakness."

Words By Dr. Vikas Amte:

  • कुष्ठरोग हा फक्त माणसालाच होतो, आणी त्यामुळे माणूस मरत नहि. 

  • "आम्हाला आनंदवन बंद करायचं आहे." "My mission is to close ANANDWAN", said Dr. Viaks Amte. "I interpret that as meaning when the mainstream society has matured to the point that no person shall become "UNWANTED" because of Leprosy or of being disabled in any way. Then there will be no need for things like ANANDWAN."

  • This is the biggest achievement of Baba's life - The empowerment of those whome the society rejected as "cursed".

  •  १९८३ मध्ये बाबांना Damien- Dutton award मिळाला. Damien- Dutton हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा award आहे. Baba Amte was the 1st non- medical person( Baba was a lawyer by profession) to win the highest medical award in the world. In 1990 he received the Templeton prize, the world's largest cash prize( worth more than the Nobel prize, popularly known as the "Nobel prize for religion").


  • Baba had one dream, which was to improve India's relation with Pakistan. त्यांना आनंदवनचा कुष्ठरोग्यांना घेऊन पाकिस्तान ला जायचे होते. त्यांनी यासाठी एक बसही विकत घेतली होति. बाबांचा स्वप्नभंग  झाला जेव्हा पाकिस्तान ने कुष्ठरोग्यांना visa देण्यास नकार दिल. Dr. विकास आमटे ना ते स्वप्न पूर्ण करायचे आहे. पाकिस्तान ला नेण्यासाठी जी बस विकत घेतली होति, ती सध्या Mobile Learning Center म्हणून वापरतात. 



भाग   भाग ३ भाग ४  continue …।

Monday 21 April 2014

आनंदवनातल्या प्रकाशवाटा भाग 1

Someone said that "Never lose an opportunity of seeing anything that is Beautiful; That is Extra-ordinary;"

I and my mates Rupesh, Sandeep, Vikas always has an obsession for seeing beautiful and unusual places. Hence we planned trip to Amte's place Anandvan & Hemalkasa.

As Dr. Vikas Amte said in talk its a journey from Stone to Milestone.


बाबा  आमटे  विषयी  आता  पर्यंत  खूप  काही  ऐकल  होत. साधना ताई चा "समिधा " मधून  ते प्रत्यक्ष  भेटले होते . त्यामुळेच आमच खूप दिवसापासून या नवीन युगातील तीर्थ क्षेत्रांना भेट दयायचा विचार चालू होता . माणस आयुष्यात निस्वार्थी मनाने काय काय करू शकतात  हे प्रत्यक्षात बघायचं होत. त्याचं काम हे फक्त कुष्ठ रोगी साठी मर्यादित न राहता अंध , अपंग, वृद्ध आणि समाजातील वंचित , दुर्लक्षित आणि मागासलेल्या घटकांपर्यंत पोहोचलेल आहे, विकास  आणि प्रकाश आमटे ते अजून पुढे घेऊन जात आहेत. 

बाबा ज्यांना गांधीजीनी "अभय साधक" हि पदवी दिली त्यांनी अगदी अपघातानेच महारोगी सेवा समितीची स्थापना केली. मागे December 2013 मधे Doctor प्रकाश आमटे पूण्यात आले होते त्यांचा "प्रकाशवाटा" पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या प्रकाशनासाठी, तो कार्यक्रम बघितल्यावरच रुपेश आणि माझ fix ठरलेलं की आपण लवकरात लवकर आनंदवन आणी हेमलकसा  ला जाऊयात. Internet वरून माहिती काढली आणी अजून कोन  कोन interested आहे ते  check केल. संदीप आणी विकास तयार झाले. आणि एवढ्या दूर जातोय तर ताडोबालाही plan मध्ये include केले, लगे हातो बाघ भी देखा जाये. कारण जंगलाच्या राजाला आतापर्यंत पिंजर्यातच बघितले होते, त्याला प्रत्यक्ष त्याचा राज्यात बघायची इच्छा होती. 

Travel Planning  :

आनंदवन आणी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा दोघांचा website वरून सगली information भेटते. (http://www.anandwan.in, http://www.lbphemalkasa.org.in) आणी आम्हाला आनंदवनातून श्री सीताकांत प्रभू आणी हेमाल्कासातून सचिन यांची plan करताना खूप मदत झाली. त्यांचाशी बोलल्यावर कळाले कि आनंद्वानाहून हेमलकसा जायला direct बस नाही आहे. वारोरयाहून अहेरी or अल्लापाल्लीची बस पकडायची आणी तेथून भामरागडची. भामरागडचा अलीकडे जवळच हेमलकसा प्रकल्प आहे. Break journey ला ७ ते ८ तास लागतात. आम्ही उन्हाळ्यात जाणार होतो आणी trip schedule थोड tight होत म्हणून कॅब book करायचं ठरलं. प्रभू काकाकडे inquiry केल्यावर विजय  जुमडे यांचा बद्दल कळले. विजय जुमडे हे आनंदवनाचे च कार्यकर्ते होते. आणी ते side by side transport चा business चालवतात. त्यांच्याशी जरा route, time, per KM rate या वर खूप वेळ हुज्जत घालून शेवटी गाडी ठरवली. 

On The Way To Anandwan:
 
आनंदवन हे वरोरा तालुक्यात येते. वरोरा रेल्वे स्टेशन पासून फक्त ५km वर आनंदवन आहे. मुंबई वरून सेवाग्राम Exp ने आपल्याला वारोऱ्या पर्यंत पोहोचता येते. (Make sure you seat in Ballarshah bogie. There are 2 extra bogies attached to Sevagra Exp which split from Wardha). आम्ही पुण्याहून सकाळी Deccan Queen ने निघालो. २. ३० तासात राणीने CST ला touch केले. CST वरून सेवाग्राम exp दूपारी ३ ला होति आणी तसे आमचा कडे ४ तास होते. म्हटल चला जरा मुंबापुरी मध्ये फेरफटका मारून येऊ. CST आणी आजूबाजूचा परिसरात खूप जुन्या buildings आहेत इंग्रजांनी बांधलेल्या. युरोपीअन वास्तुशास्त्र पद्धतीने बांधलेल्या या building बघायला छान वाटतात. दुपारच जेवण झाल्यावर CST बाहेरच असलेल्या आझाद मैदानावर मुले cricket खेळत होती ते बघत बसलो. आझाद मैदानावर आल्यावर शाळेत शिकलेल्या इतीहासाची आणी स्वातंत्र्य चळवळीची आठवण आली. ३ वाजले तसे आम्ही वारोऱ्या कडे प्रयाण केले. Train मध्ये काय time pass म्हणून आमचा नेहमीचाच गड किल्ल्यांचा गोष्टींचा फड सुरु झाला.  मागे केलेले ट्रेक पुढे करायचे ट्रेक planning इत्यादी इत्यादी . . . 

For your information सेवाग्राम exp सकाळी ४ वाजता वर्ध्या ला बल्लार शाह चे २ डबे सोडून पुढे नागपूर ला जाते. नंतर ३ तासांनी बल्लार शाह कडे जाणाऱ्या Train ला हे डबे जोडतात, तो पर्यंत वर्ध्या वर डब्यामध्ये च आराम. 
वरोरा जस जवळ येऊ लागल तस आनंदवन ची ओढ अजूनच वाढू लागली. चंद्रपूर जिल्हा हा Thermal Power Plant आणी Coal Mines साठी प्रसिद्ध आहे. त्या भागात Train ने Entry केल्या वर Thermal Power Plants आणी  Coal Mines मुळे वातावरणात बदल जाणवत होता. वारोर्याला जुमडे काकाचा मुलगा हर्शल घ्यायला आलेला.  आणी थोडयाच वेळात आनंदवन महारोगी सेवा समीती च्या कामानीने आमचे स्वागत केले. 

भाग २  भाग ३ भाग ४  continue . . . .