Wednesday 15 October 2014

रतनगड ते हरिश्चंद्रगड भाग २

कुमशेत हून पुढे. . . . 

सकाळी लवकरच उठलो. गावातल्या बायकांची झर्यावर पाण्यासाठी लगबक सुरु होती. आम्ही आमच आवरून घेतल. आजीकडे चहा मारला आणी नाश्ता पेठेची वाडी करायचा ठरवून नीघालो. आजच आम्हाला पेठेचीवाडी आणी पाचनई एवढच माहीत होत. अजून एक गोष्ट ब्रिटिशांनी त्यावेळी साम्रद गावा पासून पाचनई पर्यंत पायवाट रस्ता बनवलेला त्याचे milestone दगड अजून आहेत. काल पासून मी तेच शोधत होतो. पण अजून भरपूर surprises होती आमच्या रस्त्यात. 
 
मुळा नदी

 कुमशेत हून शिरपुंजे कडे जायचा रस्ता पकडायचा आणी वाटेत उजवी कडे टेकडी वर जायचं. टेकडीवर आलो. डाव्या बाजूला घनचक्कर दिसत होता. 
Milestone pic courtesy Amey
या टेकडीवरच तो दगड भेटला. SAMRAD १२ आणी PACHNAI ६. दगडाची रचना बघून तो ब्रिटिशानी च केला असेल असे दिसून येते. तीथे थोडी फोटोग्राफी झाली. 

पुढे अजून अचंभित करणारे ठिकाण आमची वाट बघत होते. मुळा नदीची Valley. टेकडीवरून कडेला आलो तर खाली मुळा नदी वाहत होती. हिरवी गच्च भरलेली Valley आणी उथळ पाण्याने वाहणारी मुळा. दृश्य अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे होत. आम्ही लगेच खाली निघालो. खाली मुळेला दुसर्या बाजूने अजून एक ओढा येउन मीळत होता. हे Location एकदम Perfect होत. 
मी पहिलेल एक सुंदर ठिकाण. शहरापासून दूर शांत निवांत आणी बेछूट झालेल्या पर्यटकांपासून Totally Unspoiled. त्या नदी किनार्याने पुढे निघालो. नदीत छोटे छोटे धबधबे आणी रांजणखळगे होते. पुढे दुसर्या टोकाला अजून तीकडच्या अंगाने येणारा ओढा मीळत होता. नवीन नवीन ठिकाणे Explore करण्यात हीच मजा असते. आपल्या कडची ठिकाणे ही सुंदर आहेत. तीथे अजून पैसे वाले पोहोचले नाही म्हणून तरी ती सुखरूप आणी त्याचं सौंदर्य टिकवून आहेत. 


दुसर्या संगमापाशी गावकर्यांनी छोटा बंधारा बांधून पाणी अडवलेला. त्या छोट्या बांधलेल्या तळ्यात सोनकळीची फुले मस्त बहरून आलेली. मांडलेल्या दगडातून पाणीही एका लयीत पडत होत. पुढच्या वेळी इथेच कॅम्पिंग करायचं हे केव्हाच फीक्स झालेला. पाय नीघत नव्हता पण पाचनई हून १० वाजेची राजूर ची बस पकडायची होती. 

समोरची टेकडी चढून पेठेची वाडी ला आलो. भूक लागलेली. इथे मंदीरात बसून शेव कुरमुरे फरसाण मीक्स करून भेळ केली. 
दरवाज्या वरचे नक्षी काम
 इथून पुढे proper गाडी रस्ता आहे. त्या रस्त्याने चालताना वाटल आता काय संपला ट्रेक. पाचनई पर्यंत हाच रस्ता धरायचा. पण कोणास ठाऊक सह्याद्री कडे नेहमीच देण्या सारख असत. भटक्यांसाठी त्याची ओंजळ नेहमीच भरलेली असते. समोर एक छोटासा किल्ला आहे. त्याला वळसा घालून आम्ही पलीकडे आलो. समोर रस्ता बघीतला तर तो फार वळसा घेत जात होता. बरोबर जाणार्या गुराख्याला रस्ता विचारला तर तो म्हणाला हे इथून खाली उतारा अर्ध्या तासात पाचनई. अगदी हौस म्हणून आम्ही डोंगराची वाट धरली आणी दरीत उतरलो. परत झाड बाजूला सारत रस्ता कापायला लागलो. तो भीडू तर गुर चारायला निघून गेला. आता रस्ता शोधण्याची पाळी आमच्यावर आलेली. त्याचा माहीती प्रमाणे ओढा cross करायचा होता. थोड पुढे आलो तस ओढा आला. मग काय परत विसावा, कॅमेरा तर बाहेर निघणारच होता. डोंगराच पाणी पोटभर पीलो आणी पुढे निघालो. Pilot ट्रेक करताना रस्ता शोधता शोधता अचानक अश्या ठिकाणी येतो की आपण कधी ऐकल नव्हत आणी विचारही केला नसतो. 



आम्ही असच शोध घेत असताना एका बाजूला खाली उतरलो तर आमच्या समोर एक मोठ तळ आणी त्या पुढे ३ धारेत विभागलेला एक सुंदर धबधबा. आमच्या प्लान मध्ये हे नव्हतच. आम्ही क्षणात पाचनई, १० वाजेची बस , चुकलेला रस्ता सगळ विसरलो आणी म्हटलो की यार एक डुबकी तो बनती हे. आजची अंघोळ ही बाकी होती. तळ जास्त खोल नव्हत पण त्यात पोहू शकत होतो. पोहत पोहत धबधब्या पर्यंत आलो. पाण्याचा force खूप होता. त्याचा खाली उभ राहील तर अंग अगदी शेकून निघत होत. Natural Massage. तीथे मनसोक्त पोहन झाल. आणी अर्थात फोटो. ट्रेक सुरु झाल्यापासून कपडे तेच होते. घामाचा सुवास येत होता. इथेच कपडे बदलले. आणी वर आलो. आम्ही जीथून खाली गेलो तीथूनच एक सरळ रस्ता जात होता. तीकडे गेलो. खालच्या धबधब्याला जाणारा झरा लागतो. त्या झर्याकडे बघून वाटत नव्हत खाली इतका सुंदर नजारा असेल. त्या रस्त्याने वर आल्यावर एक पठार लागत. ते चालून गेल्यावर पुढे माणसांचे आवाज येत होते. तीथे परत हाका हाकी झाली. त्यांनी आम्हाला बघीतल आणी बरोबर रस्ता दाखवला. तीथून अगदी १०
मिनिटावर पाचनई होत. १२ वाजलेले. आमची बस तर गेलीच होती. तीथल्या हॉटेल मध्ये जंगलातल्या रानमेव्याचा अर्थात करवंद आणी जम्भूलाचा juice घेतला. 

सगळे ट्रेक भीडू relax होत होते. समोर हरीश्चंद्रगड होता. केदारेश्वर आणी कोकणकडा खुणावत होत पण या प्लान मध्ये ते include नव्हत. मागे बघीतल तर सह्याद्री ची अफाट range दीसत होती. आम्ही चालून आलेली रांग. रतनवाडी . . . रतनगड … कात्राबाई करत , कुमशेत पेठेची वाडी . . . मुळा नदी आणी मग पाचनई. एक मस्त range ट्रेक झालेला. आता घरची चाहूल लागलेली. लवकर पोहोचायचं होत कारण उद्या office होत. तीथे राजूर पर्यंत जायला जीपची Inquiry केली. दुसर काही साधन नसल्याने आम्हाला special जीप करावी लागली. त्यातून जाताना असाच एक मनात विचार आला की काल पण शेंडी ते रतनवाडी special जीप आणी आज पण. TTMM असलेला हा budget ट्रेक होता, पण त्यात कात्राबाई ने आमच्या खीशाला चांगलीच कात्री लावली होती. तरी गाठीला तीने एक मस्त अनुभव आणी एक perfect weekend दीला. 
कात्राबाई पास अगदी मस्त. . . .

कात्राबाई पास

रतनगड हून पूढे.


इथून पुढचा रस्ता कोणालाही ठाऊक नव्हता. या पूढची माहिती सगळी ऐकीव होती. Pilot ट्रेक ची एक मजा असते. ग्रूप मधले सगळे रस्ता शोधण्यासाठी डोक लावत असतात आणी त्यांचा कडचे Intelligent कौशल्य पणाला लावत असतात. तसा हा रस्ता चांगलाच मळलेला आहे. वाटेत भरपूर पायवाटा येतात. पण आपण उजव्या बाजूची वाट सोडायची नाही. हा रस्ता अग्निबाण सुळक्याला वळसा घालून जातो. 

मागे वळून बघीतल तर रतनगड, खुट्टा, AMK, आणी कळसुबाई range दिसत होती. आता कात्राबाई च जंगल सुरु झालेलं. पावसामुळे वाटेत भरपूर झाडे उन्मळून पडले होते. एका झर्या पाशी विश्रांती थांबा घेतला. पाण्याचा बाटल्या होत्या आमच्या कडे. पण ट्रेकर ची तहान ही फक्त अशा झर्यांच्या पाण्यानेच भागते.  येताना फळांचा जीन्नस आणला होता. आमच्या मागून एक आजोबा येत होते. त्यानाही आमच्या खाऊगल्लीत सामाऊन घेतल. त्यांच्याशी थोडी रस्त्याची विचारपूस केली आणी पुढे नीघालो. जस जस आम्ही खिंडी कडे चढत जात होतो तस जंगल फार दाट होत चालल होत.
करवी
आम्ही अग्निबाण सुळका क्रॉस करून आलो होतो पण दाट झाडीमुळे काहीच कळत नव्हते. कात्राबाईच घनदाट जंगल आतापर्यंत ऐकून होतो ते आता प्रत्यक्षात अनुभवत होतो.

ट्रेक सुरु होऊन ४ तास झालेले. खिंडीजवळ पोहोचत आलो होतो. इथले सह्याद्रीचे कडे आणी डेरेदार झाड बघून धडकीच भरत होती. इथून झिग zag करत रस्ता सुरू झाला की समझायचं खिंड जवळ आली. रस्त्याने जंगली प्राण्याची विष्ठा दिसली. कोणाची होती काही समझले नही पण core जंगल असल्याने बिबट्याची भीती होतीच. मी ती खिंड चढू लागलो. थकवा जाणवत होता आणी भूकही लागली होती. पण तीथे थांबणे शक्य नव्हते. कारण जंगली प्राण्याची भीती होतीच आणी घनदाट रस्ता काही संपत नव्हता. तो चढून वर आलो. सह्याद्रीतला नीसर्ग कसा क्षणात रूप बदलतो याचा अनुभव भटकताना नेहमी येतो. खिंडीत घनदाट झाडी होती. आणी वरती Daughter of Sahyadri म्हणून ओळखली जाणारी कारवी च अख्ख रान होत. पूर्ण  पठार कारवी ने भरून होत. अगदी हिरवागार पट्टा दिसत होता. 


त्या करवीतून रस्ता शोधत शोधत पूढे नीघालो. आता कात्राबाईच मंदीर शोधायचं होत. मागे वळून पाहील तर अख्ख भांडारदरा जलाशय आणी अफाट सह्याद्री पसरलेला होता. तीथून Bird Eye View भेटत होता. डाव्या बाजूला अग्निबाण रतनगड आणी रतनवाडी यांचा मागमूसही दिसत नव्हता. खूप मोठा पट्टा cover झाला होता. कारवी च्या झुडपातून बाहेर आलो. इथे मला पहिल्यांदाच दोन्ही प्रकारची कारवी दीसली. Baby कारवी जे छोटास झुडूप असत आणी नेहमीची करवी जी जवळ जवळ १०फूट उंच असते. 

उजव्या बाजूला एका झाडाच्या शेंड्याला उन्हा पाण्याने आणी बोचर्या हवेने निर्विकार झालेला भगवा फडकताना दिसला. तेच हे कात्राबाईच मंदीर. इथून खाली उतरताना ३ रस्ते लागतात मधला खाली \कुमशेत ला जातो आणी उजवा कात्राबाई मंदिर आणी कात्राकड्या वर जातो. मंदिराकडे आलो आणी पाठीवरच ओझ झटकल. 


कात्राबाई   

झाडाच्या बुंध्याला शेंदूर फासलेला, ४/५ दगड व्यवस्थीत रचलेले आणी कोण्या एका मूर्तीकाराने दगडातून घडवलेली कात्राबाई. मन अगदी प्रसन्न झाल. दिवाबत्तीची केलेली छोटीसी सोय. आणी गावकर्यांनी देवीची खाणा नारळाने भरलेली ओटी. देवी साठी बांधलेली हिरव्या बांगड्याची चूडी. कोण्या भटक्याने मंदिरासाठी वाहीलेले १/२ रुपयाचे नाणे. आणी मंदीर ओसरीवर बसून अंगावर घेतलेला सह्याद्रीचा भन्नाट वारा. कूठे तरी वाचलेलं मंदिराला देवपण हे तीथल्या वातावरणाने येत. ऐन नवरात्रीत कात्राबाई च्या अश्या दर्शनाने मन भरून आल.  
नेहमी मी मंदीरात जायचं टाळतोच पण अश्या ठीकाणी आल्यावर दोन क्षण तरी विसावा घेतो. काही तरी असत जगात ज्याला आपण देव म्हणतो. आणी अश्याच ठीकाणी निसर्गाच्या त्या शक्ती जवळ आल्याचा भास होतो. 

बाहेर आलो आणी जोरात शिट्टी घुमवली. सवंगड्यांची यायची वाट बघत होतो. एकमेकांना हाक हकी झाली. सगळी मंडळी जमा झाल्यावर कात्राबाई सोबतच जेवण उरकल. सचिन ने घरून डबा आणलेला होता. आम्ही चौघ लगेच तुटून पडलो. ओसरीवर ची झालेली घाण लगेच झाडून काढली. time खूप झालेला म्हणून कात्रा कडा cancel केला. 
मधला रस्ता पकडून उतरायला सुरुवात केली. हा रस्ता वळण घेत घेत फार कडयाने जातो. आता समोर कुमशेत चा कोंबडा दिसायला लागला होता. रात्री वस्ती साठी कुमशेत गाठायचं होत. या बाजूला पण कडे कपार्यातून झरे वाहतच होते. अशाच एका झर्यावर refresh झालो. खाली आलो तस भात शेती लागली. 

 इथून सरळ रस्ता होता. उजव्या बाजूला आजोबा डोंगर खूणावत होता. वाटेत गुर चारायला आलेल्या आजींशी गप्पा मारल्या. त्या कुम्शेतच्याच. सोनाबाई त्याचं नाव. त्यांनी गावाचा रस्ता दाखवला. आम्ही शाळेत पोहोचून bags उतरवल्या. 



सूर्यास्ताची वेळ आलेली. दिवसभर सोबत असणाऱ्या सुर्यानारायानाला राम राम म्हणून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. 

Dinner चा मेनू होता Maggy. चूल बनवायची होती. काम वाटून घेतली. एकाने लाकड गोळा करायची एकाने झर्यातून पाणी आणायचं आणी एकाने सामानाची जुळवाजुळव करायची. आमची Maggy बघायला आज्जी बाई हि आल्याहोत्या. कोणास ठाऊक त्यांना कौतुक ही वाटत होत. त्यांनी नंतर आम्हाला घरातून भातही बनून आणून दिला. त्यांच्याशी आमची चांगलीच मैत्री झालेली. त्यांच्याशी मस्त गप्पा रंगल्या होत्या. जेवण झाल्यावर शेकोटी पाशी शेकत बसलो. रात्री चांदण मस्त पडलेला. चांदण्यांनी भरलेल्या आकाशात मस्त एक चक्कर मारली. आणी थोड्या वेळाने आम्ही शाळेच्या आवारात गुडूप झालो. 
आता उद्याचा प्रवास होता पेठेची वाडी हून पाचनई

Tuesday 14 October 2014

रतनगड ते हरिश्चंद्रगड via कात्राबाई पास भाग १

अगदी सुरुवातीला या ट्रेक बद्दल वाचले होते. तेव्हा पासूनची इच्छा होती. मध्ये रतनगड आणि हरिश्चंद्रगड स्वतंत्र करून झालेले. पण मधल्या कात्राबाई पट्ट्याचा काही योग नाही आला. म्हणूनच या परिसरात भटकंती करावी असा वटहुकूम काढला. नवरात्री मधला वीकेंड ठरवला. आणि TTMM ट्रेक करायला मावळेही तयार झाले. मी शुक्रवारी रात्री पुणेहून नाशिक इगतपुरी असा प्रवास केला आणि बाकी मंडळी थेट इगतपुरीला भेटली.

वेगवेगळे आलो असलो तरी आम्ही सगळे सकाळी ४ ला इगतपुरी touch होतो. तिथून सकाळी ५ ची शेंडी साठी बस होती. तोपर्यंत बस stand वर डास मारत बसलो. रात्रीच्या प्रवासामुळे कोणाचीही झोप झालेली नव्हती. म्हणून बस मध्ये सगळ्यांनी separate seat पकडून डुलक्या काढून घेतल्या. पण जशी उजाडतीची किरणे लागली तस सह्याद्री च सौंदर्य दिसायला लागल. खाली उतरलेले ढग…… कोवळ्या किरणांमध्ये चमकणारे दवबिंदू. आणि उजाडतीच्या रंगात रंगलेले आकाश. चालू बस मधून ते द्रुश्य कॅमेरा मध्ये घेण्याचा मोह काही आवरला नाही. नवरात्री चे दिवस होते. बस मध्ये थोडी गर्दी हि होती. ही सगळी मंडळी कळसुबाई ला देवीच्या दर्शनासाठी उतरली. तेथून थोड्याच वेळात शेंडी ला आलो.
भंडारदरा धरण

सकाळची वेळ होती. गाव तस अजून पूर्ण जाग व्हायचं होत. समोर एक जीप वाला होता. रतनवाडी बद्दल विचारले. पैसे ऐकून आम्ही शांत बसलो. जेट्टी बोट अजून यायला time होता म्हणून धरणावर आलो. Backwater पूर्ण धूक्यात होत. भांडारदर्याला आता पर्यंत भरपूर दा आलो होतो. पण सकाळच हे सौंदर्य प्रथमच बघत होतो. 
 वेळेचा सदुपयोग म्हणून अंघोळ करावी असा विचार केला. स्विमिंग पूल आणी नदी मध्ये याआधी हात आजमावला होता. धरणात पहिलीच वेळ होती. सकाळची थंडीही बोचत होती पण जस पाण्यात शीरलो तस उबदार वाटायला लागल. तीथे स्वीम्मिंग आणी फोटोग्राफीच कौशल्य दाखवल्या नंतर परत stand कडे आलो. नाश्ता केल्यावर गाडीवाल्याशी थोडी bargaining करून रतनवाडी कडे निघालो. रस्ता मस्त पूर्ण धरणाला वळसा घालून जातो. वाटेत अमेय ने चालू गाडीत माझा एक मस्त फोटो घेतला.
अमृतेश्वर मंदीर आणी पाठीमागे रतनगड

रतनवाडीस आलो. पुष्करणी चांगलीच पाण्याने भरलेली होती. पण उनाड पर्यटकांनी त्यातही बाटल्या आणी कचरा केला होता. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना त्याच पावित्र्य राखायच कोणालाही वेळ नाही. रतनवाडी च अमृतेश्वर मंदीर आणी पुष्करणी भारतीय स्थापत्य कलेचा एक सुंदर उधाहरण आहे. अमृतेश्वराच दर्शन घेऊन ट्रेक ची सुरुवात होणार होती. रतनगड ट्रेक च हेच वैशिष्ट्य आहे. सुरुवातीलाच अमृतेश्वाराने दर्शन दिल्याने ट्रेक निश्चितच सुंदर होणार होता. रतनवाडी हे भंडारदरा backwater मधल एक टुमदार गाव. मंदिरामागुनच अमृतवाहिनी म्हणून\ओळखली जाणारी प्रवरा नदी खळखळत जाते.

नदीच्या काठाकाठाने ट्रेकला सुरुवात केली. नदीच पात्र ३/४ वेळा पार कराव लागत. डोंगराच्या बंधाबंधाने केलेली भातशेती आणी नागमोडी वळणे घेत वाहणारी प्रवरा मन प्रसन्न करत होती. चालताना मागे केलेल्या रतनगड night ट्रेक ची आठवण येत होती. सूर्य वर आल्याने चालताना चढावर धाप लागत होती. २/३ stop घेत घेत कात्राबाई कडे जाणार्या point कडे आलो. इथून वर जाणारा रस्ता शीडी मार्गे रतनगडा वर जातो. आम्ही रतनगड बायपास करून कात्राबाई चा रस्ता धरला. थोड पुढे आल्यावर २ मोठे कुंड दिसतात. हे ठिकाण प्रवरेचा प्रतीकात्मिक उगम म्हणून ओळखले जाते. 
या पुढे पूर्णपणे आमचा pilot ट्रेक सुरु होणार होता.
 

Saturday 19 July 2014

दुर्गराज रायगड प्रदक्षिणा…. Raigad Pradakshina

 दुर्ग दुर्गेश्वर रायगड, शिवकोट रायगड…. हिंदवी स्वराज्याचे तीर्थक्षेत्र रायगड!!!!!

दुर्गराज रायगड आणी टकमक टोक. 
 Many people has been to Raigad, But has anyone thought why Chhatrapati Shivaji Maharaj has chosen this fort as the capital for Hindavi Swarajya... For this you have to complete Pradakshina of Raigad fort.

"Fort Raigad is much more than a mere tourist spot. It is sacred place of piligrimage, which has left impression of the grand vision of Hindavi Swarajya as cherished by Chhatrapati Shivaji Maharaj.."
British has also defined the fort Raigad as "The Gibraltar of East"

रायगड प्रदक्षिणा…माझी खूप दिवसापासुंची इच्छा होती.…. शिवरायांचा रायगड बघणे पण बाकी होते. जशी मंदिरात जाऊन देवाच दर्शन घेतल्या नंतर त्याला प्रदक्षिणा मारल्या शिवाय देवाच दर्शन पूर्ण होत नाही… अगदी त्या प्रमाणेच महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या रायगडला नुसतं जाऊन न बघता त्याच्या सभोवताली फिरून प्रदक्षिणा मारल्या शिवाय स्वराज्याच्या राजधानी चे महत्व कळत नाही आणी त्या शिवाय रायगड दर्शनही पूर्ण होत नाही. 


प्रदक्षिणा मारताना रायगड नेहमी आपल्या समोर राहतो. त्याची भव्यता… त्याची खडी भिंत… घनदाट जंगल… आजूबाजूला पसरलेल्या पहाडा मधले कावळ्या बावळ्या, लिंगाणा, कोकणदिवा, असे संरक्षक किल्ले आणि कोठूनही वर चढण्यास अवघड असा रायरीचा डोंगर…  यासाठीच महाराजांनी कदाचीत राजधानी साठी याची नीवड केली असावी… 

नेहमी प्रमाणे रुपेश आणि मी प्रदक्षिणेसाठी केव्हा पासून वाट पाहत होतो. २०१४ चा राज्याभिषेक दिन आम्ही target केलेला, पण काही कारणास्तव तो बेत रद्द करावा लागला. मग जूनच्या शेवटच्या weekend ला मोहीम हाती घ्यायची असा वटहुकूम काढला. Friday ला रात्री  प्रवास करून Saturday प्रदक्षिणा मुक्काम वरती रायगड आणि Sunday रायगड बघून परतीची वाट पूणे असा साधारण Plan होता.
Swargate हून रात्री १० ची शेवटची २X२ एशियाड पकडायची होती. ऑफिसातून येउन सगळ आवरून जेवण करून Swargate गाठायचं होत. रुपेश पहिले आला आणी गाडी लागली आहे बघून गाडीत चांगली जागा पकडून ठेवली. पण सुखाचा प्रवास आमच्या नशिबात नव्हता. आमची गाडी (आदरार्थी बहुवचन …  Talking about myself…  :) ) नेहमी प्रमाणे उशीरा पोहोचलो. आणि रुपेश ला परत सगळ सामान काढून ठेऊन तासभर माझी वाट बघत बसावी लागली… नंतर रात्री १२ ला खेड कडे जाणारी via महाड बस आली(लाल  डब्बा) तीच्यात भली मोठी गर्दी… आम्हाला मागची Seat भेटली. वजनदार ब्यागा उचलल्या आणी महाड पर्यंतचा प्रवास ST च्या मागच्या चाका बरोबर उडया मारत सुरु झाला. सकाळी ३ ला महाड ला पोहोचलो. झोप तर काही झाली नव्हती. पाचाड साठी Enquiry केली तर एक बस लागली होती(लाल डब्बा). ती ४ ला निघणार होती. रिकामी होती… म्हणून जाऊन झोपावं म्हटल पण थोड्या वेळातच डासांनी हैराण केल. ५ ला पाचाड आल. रात्रभर झोप नव्हती आणी थोड्यावेळात दिवस उजाडणार म्हणून गावातील देशमुखांच्या हॉटेल समोर थोड अंग टाकल. 
सकाळी सकाळी हॉटेलच्या आवरण्याच्या आवाजाने जाग आली… डोळे तसे सुजलेलेच होते. आवरल हॉटेलात चहा नाष्टा सांगितला आणि रायगड कडे कूच केले. 
दगडू , रुपेश  आणी वरती महादरवाजा
प्रदक्षिणा ही चीत्त दरवाजा पासून सुरु होते आणी रैयनक स्मारक, टकमक पायथा, लिंगाणा दर्शन, वाघोली खिंड, काळकाई खिंड, हिरकणी गाव करत चीत्त दरवाजा पाशीच संपते. चीत्त दरवाजा पाशी गावातल्या वाटाड्या ला घेतल आणी मोहिमेला सुरुवात केली. समोरच टकमक टोक दिसत. त्या पाठी ढग जमा झालेले होते. पण पावसाचे काही चिन्ह नव्हते. जून सुरुवातीला पाउस झालेला, तसा इथल्या शेतकर्यांनी भाताच्या पेरणीला सुरुवात केलेली. कोकणातील मुख्य पीक भात. जाताना जागोजागी मस्त हिरवेगार भाताची रोपे दिसत होती. पूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर व्यवस्तीत marking केलेली आहे. त्यामुळे हरवण्याचे chances फार कमी आहेत. थोड्यावेळात टकमक पायथ्यापाशी आलो. बरोबर टकमक पायथ्याखाली रायनक स्मारक आहे.  आमचा वाटाड्या दगडू (Timepass फेम नव्हे बरका). याने त्या बद्दल थोडी माहिती दिली.
रायनक स्मारक

कावळ्या बावल्या
टकमक 

विसावा घेऊन थोडी photography झाल्यावर पूढे निघालो. खालून पाहता टकमक ची भव्यता आणि सरळ पाषाणातील कडा भयंकर वाटत होता. कडेलोट साठी निवड अचूक होती. वाटेत पुढे एक आदिवासी पाडा लागला. इथूनच दूरवर लिंगाण्याचे पहिले दर्शन झाले. लिंगाण्याच सरळ टोक आकाशात घुसल होत. आम्ही सोबत आणलेलं chocolate biscuit त्या मुलांना दिले. त्यांची एक चांगली गोष्ट निदर्शनास आली. Sharing. Chocolate Biscuit ची पिशवी देताच त्यांनी मुलांना सांगीतले वाटून खा. खरच Share करण्यात वेगळीच मजा असते. 
लिंगाणा दर्शन
 रायगड हा चहुबाजूनी खड्या कापरींनी वेढलेला आहे. असंख्य पावसाळी धबधब्यांच्या खुणा त्यावर दिसत होत्या. आम्हाला वाटेत भरपूर सुकलेले ओढे दिसले. आता घनदाट जंगलाला सुरुवात झालेली. दगडूच्या माहीती प्रमाणे तीथे रानडुक्कर हरीण चितळ आणी बिबट्या असतात. रायगडचा घेरा भला मोठा आहे. जंगल आइस्पैस पसरलेला आहे. दूर तीकडे लिंगाण्याच्या खाली काळ नदीच पात्र आणि लिंगाण्या हून रायगड कडे येताना लागणार पाने गाव दिसत होत. आम्ही रायगड च शेवटच टोक भवानी कडा कडे पोहोचत होतो. इथेच वाघोलीची खिंड लागते. जंगल खूप घनदाट झाल… वाटेत आडव्या झाडाच्या फांद्या, वेली आणि गच्च भरलेला जंगल होत. आम्हाला चालतानाही वरून उड्या मारून फांद्या बाजूला सारून रस्ता काढावा लागत होता. वाघोलीची खिंड चांगलीच मोठी होती, इथे कोकमचे झाड होते. पहिल्यांदा कोकम चे फळ बघत होतो. पाण्या साठी कोकम चांगल असत. तस आम्ही पिशवी भर जमा केले. Pure कोकम ची taste मस्त होती. त्याच्या साली वालावूनच आमसूल तयार करतात. 
कोकम
वाघोली खिंड

जंगल वाढल तस डास किडे जास्त मागे लागले.… आणि खिंड ही चांगलाच दम काढत होती. मध्ये मध्ये Stop घेत घेत आम्ही ती खिंड चढलो. प्रचंड घाम काढला तीने. त्यात डास त्रास द्यायला होतेच. रुपेश ने ODOMOS लावलं सगळ्या अंगावर पण डासांना काही झालंच नाही. 

आता आम्ही भवानी कड्या खाली होतो. इथून उतार होता. समोर वाघोली गाव दिसत होत. थोडा विसावा घेऊन पुढे उतरणीला सुरुवात केली. Packed Lunch होता… भूक पण थोडी लागली होती. पण जेवायला चांगली जागाच नव्हती. आणि पाणी पण संपत आलेलं. पुढे चालू लागलो. आता आम्ही अर्धी रायगड प्रदक्षिणा पूर्ण केलेली. आता आम्ही रायगड चा दुसर्या बाजूला आलेलो. थोड जंगल cross करून मोकळ्या जागी आल्यावर आम्हाला काळकाई आणी पोताल्याचा डोंगर दिसायला लागले. हाच तो पोताल्याचा डोंगर. सरळ मार्गाने रायगडावर विजय मिळवता येत नव्हता. आणि गडास वेढा देऊनही काही फायदा नव्हता. त्याच वेळी मराठी सेनेतील काही गाद्दरानी ब्रीटीशाना तोफा पोताल्याचा डोंगरावर नेण्यास मदत केली. आणि तेथून दारुगोळा कोठारावर तोफेचा मारा केला. 

वाघ दरवाजा
वरून येणाऱ्या एका धबधब्याच्या ओढ्या पाशी आराम केला. जंगल अजून संपेनाच. पुढे दगडूने झाडात लपलेला वाघ दरवाजा दाखवला. याच वाघ दरवाजातून राजाराम आणी ताराराणी चोरवाटेने  गेले होते. वर पाहता दरवाजा अगदी दरीच्या टोकाशी होता. आणि चोर वाटेसाठी योग्य होता. वरून येणाऱ्या पाण्याच्या वाटेवर हातपाय neat धून घेतले. आता काळकाई खिंडीची चढाई सुरु होणार होती. ही खिंड चढल्यावर हिरकणी वाडी हून वाघोली गावाकडे जाणारा बैलगाडी रस्ता लागतो. खिंड चढून पोताल्याच्या डोंगराच्या तोंडापाशी आलो.
इथे काळकाई देवीच अगदी छोट मंदिर आहे. पाहताक्षणी समाजातही नाही. पण फुले ठेवली होती. त्याने समजले. आता इथून पुढे बैलगाडी रस्ता होता.… थोड चालल्यावर रायगड Rope way दिसायला लागला. आणि प्रदक्षिणा पुर्तीची चिन्हे दिसायला लागली. हिरकणी वाडीत एका हॉटेलात जेवनाच आणि अंघोळीच सांगीतल. आणी चित्त दरवाजा पर्यंत जाऊन प्रदक्षिणा पूर्ण केली….   

महाराजांच्या गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सह्याद्रीतील गिर्यारोहणाचे एक महत्वपूर्ण तप आम्ही पूर्ण केल होत. 

आता पुढे रायगड भ्रमंती साठी नीघायचे होते…

Sunday 8 June 2014

न दिसलेला वाघ

वाघ!!! या नावातच किती दरारा आहे ना, आणी तो एकदम समोर आला तर. तुम्ही रस्त्याच्या मध्ये उभे आहात आणी अचानक तुमच्या gypsy समोर वाघ रोखून उभा असला, आणी क्षणात त्याने झुडपात उभ्या असलेल्या हरिणावर झेप घेतली तर. तुम्ही किर्र घनदाट जंगलात फिरत आहात, आणी अचानक पक्षी सैरभैर उडू लागले, हरीण सांबर पळू लागले आणी पुढच्याच क्षणी वाघाची डरकाळी तुमच्या कानावर आली तर.... 

Just Imagine TIGER in front of you, Directly Looking into your eyes.... Roaring...and Slowly Slowly Reaching Near to U.........
                                                                Wild Roaring Beauty

आता पर्यंत पिंजारातलाच वाघ बघितला होता, पण आम्हाला खरा वाघाचा थरार अनुभवायचा होता. जंगलाचा राजा, त्याचा रुबाब. . . . . हेच सगळ बघण्यासाठी ताडोबा कडे निघालो.
Tadoba has biggest Male TIGER of Asia Named as "WAGHDOH".... "वाघडोह". . . नावातच वजन आहे.

हेमलकसा प्रकल्प बघून झाल्यावर ताडोबकडे निघालो. जुमडे काकांची गाडी तयारच होती. Bags गाडीत टाकल्या आणि गाडी निघाली. वाटेत रस्त्यात आदिवासी मुले तेम्भूर विकत होती, परतताना आम्हाला तोच पैनगंगा नदीचा पूल लागला. view छान असल्यामुळे काकांना गाडी side ला घ्यायला सांगीतली. नदीच पात्र खूप मोठ होत आणी पाणी एकदम स्वच्छ आणी उथळ होत. दुपारची वेळ असल्यामुळे नदीपात्रातील वाळू छान चमकत होती. तीथे थोडी photography झाल्यावर पुन्हा आपली वाट धरली.
Painganga River
१२ वाजत आले होते, चंद्रपूर लाच जेवणाचा halt घेतला. मनसोक्त जेवलो, काकाही सोबत होते, त्याचं गाडीच payment करायचं बाकी होत. बाजूलाच असलेल्या ICICI ATM मध्ये गेलो.. . . . OH MY GOD.... आयुष्यात एव्हडे slow ATM बघीतले नव्हते. मला काही हजार रुपये काढण्यासाठी १५ ते २० मिनिट वाट बघावी लागली. 
चंद्रपूर पासून साधारण २५km असेल ताडोबा मोहरली gate. जाताना आम्हाला कोळास्याची खाण लागली. आता पर्यंत खाण बघीतली नव्हती. फार मोठी होती ती खाण, दुरून बघताना एखाद्या ज्वालामुखी सारखीच भासत होती ती.

मोहरली Gate जस जवळ येत होत तशी उत्सुकता वाढत होती . ताडोबाच्या Buffer Zone च Gate आल. तीथे गाडीची Entry करावी लागते. आम्ही आता ताडोबाच्या जंगलात होतो. रस्ता एकदम Straight अगदी दूर पर्यंत दिसत होता. आत आल्यावर आम्ही सगळे चांगलेच Interest मध्ये आलो होतो. तेव्हाच गाडी मध्ये संदीप ने एक Video Shoot केला. आम्ही त्यात आमचे Views आणी जंगलाच्या राजाला पहायची उत्सुकता सांगत होतो. Video बाकी मस्त आलाय. तेव्हाच मनात एक विचार आला Camera Ready ठेवावा. न जाणो नशीबाने Starting मधेच   १/२ वाघ दिसावेत. (पण तेव्हा माहीत नव्हत न कि यावेळी वाघासाठी आमच्या सगळ्यांच नशीब फुटक होत. ) असो. मोहरली गावापाशी एक Lake आहे तीथे भरपूर पक्षी असतात. मोहरली गावात ताडोबाच्या Main Entry पाशी Forest Rest House कुठे आहे वीचारले. (Forest MTDC च Tent च Booking होत.) हनुमान मंदिरापासून उजव्या हाताला २KM वर MTDC आणी Forest MTDC असे दोघांचे Rest House आहे. तीथे Reception पाशी आमच Booking Confirm करून Tent मध्ये आलो. Tent Accommodation आमच्या विचारा पेक्षा मस्त होत. 2bed with attached bathroom, cooler, cupboard, table. दिवसा ताडोबा मध्ये चांगलाच गरमत, पण सकाळी सकाळी तापमान घटत त्यात त्या Cooler ने चांगलीच थंडी वाजायची. जुमडे काका ताडोबा पर्यंत च होते. त्यांची बाकी Complete केली आणी त्यांना परत भेटण्याचा नीरोप दिला.

आता मुख्य प्रश्न हा होता कि आमची Safari दुसर्या दिवशी दुपारी होती. आणि एव्हडा वेळ आमच्या कडे TimePass साठी काहीही नव्हते. समान Tent मध्ये टाकले आणी आम्ही जरा Resort चा परिसर हिंडून आलो. Resort चा Area मोठा आहे. तिथल्या Tower वर गेलो. तिथून आजूबाजूचा संपूर्ण परिसर न्याहाळता यायचा. दुपारी थोडी झोप काढली. संध्याकाळ झाली तस गावात आणी जवळच्या Lake वर फिरून येऊ म्हटलं. रात्रीच्या जेवणाची पण सोय करायची होती.

Lotus in the Lake
रस्त्याने जाताना आम्हाला एक माकड दिसलं.. . . .  त्याला  बघून एक विचार आला कि. . . . च्या मारी आपण एव्हड्या दूर वाघ बघायला आलोत खर पण समजा. . . . वाघ दिसलाच नाही तर, घरी काय सांगायचं की तीकडे जाऊन काय बघितले तर माकड. ते तर आपल्या कडे पण दिसतात राव. मनात अश्या विचारांना थारा द्यायचा नसतो. . . .  अशे विचार झटकन थांबवले आणी पुढे निघालो.
गावात आलो तिथे मारुतीचे मंदिर होते, आम्ही आलो तो दिवस पण हनुमान जयंती होती. . . . म्हटलं येता येताच हनुमंत चे दर्शन झाले एक गोष्ट तर चांगली झाली. ताडोबा मोहरली gate पाशी Inquiry केली आणि गावात  जेवायची सोय बघायला आलो. आम्ही पुण्यातून येतानाच रुपेश च्या ओळखीने पक्षी तज्ञ किरण पुरंदरे ना भेटून आलो होतो. ताडोबाच्या एकंदरीत Safari च्या माहिती साठी. त्यांनी येथील एका Guide चा Referenceदिला होता. जेवायला वेळ होता तस आम्ही त्या Guide ला शोधले. Guide च्या माहिती प्रमाणे ताडोबाचा मोठा वाघ "वाघडोह" आणी "शिवा" याचं Buffer Zone मध्ये Sighting चालू होत. आम्ही Buffer Zone मध्ये Safari करायचं ठरवले. दुसर्या दिवशी सकाळी Time होता. तेव्हा ताडोबा Buffer Zone Fix केल. जेवण झाल तस Guide ने Tent मध्ये सोडायला Gypsy पाठवली.

सकाळची Safari ६ वाजता होती. लवकर उठण भाग होत, आमचा Safari Driver सचिन ५.३० लाच आला. आम्ही तयारच होतो, आता वेध लागले होते "वाघडोह" च्या दर्शनाचे. हवेत गारवा होता. Buffer Zone च्या Gate पाशी Guide घेतला आणी पुढे निघालो. 
आम्ही सगळेच उत्स्तुक. सगळ्यांच्या नजरा चोहीकडे भिरभिरत होत्या. बारीक आवाजालाही आमचे कान सतर्क होते. मी Camera Ready ठेवला. Gypsy Type गाडीत जाताना एक वेगळाच Feel येत होता. Buffer Zone मधल जंगल चांगलच घनदाट होत. गाडी पुढे जात होती आम्ही डोळ्यात तेल घालून बघत होतो. आमच सर्व लक्ष Guide च्या इशार्या कडे होत. Guide रस्त्याने कुठे वाघांच्या पायाचे ठसे दिसताहेत का बघत होता. गाडीतल्या सगळ्यांच एकच लक्ष होत "वाघ". रस्त्याने आडव्या येणाऱ्या फांद्या आडव्या सारत आम्ही पुढे निघालो. गाडीने Turn घेतला तस एकदम समोर काहीतरी असल्या सारख भास झाला. ते एक सांबर होत. रस्त्याने पुढे आम्हाला गवाही दिसला. प्रचंड मोठा होता. गाडीला धडक दिली असती तर क्षणात गाडी उलटी. 

पुढे एका तळया पाशी आलो. तीथे वाघ पाणी प्यायला येतो अस Guide म्हणाला. तीथे वाट पाहत थांबलो.

Gawa
पाणी असल्यामुळे तीथे पक्षीही भरपूर होते. आता नाव नाही आठवत पण तीथे आम्हाला स्वर्गीय नर्तक दिसला. आकाराने लहान असलेला हा पक्षी त्याचा लांब शेपटीने ओळखला जातो. लांब शेपटी मुळे हवेत उडताना तो नाचत असल्यासारखा दिसतो. पानावठ्या पाशी वाघाच्या पायांचे ठसे Guide ने दाखवले. त्याच्या माहीती प्रमाणे ते कालचे होते. 


वाघ येत नाही म्हणून आम्ही दुसर्या Tower कडे गेलो. १० वाजे पर्यंत पूर्ण Buffer Zone पिंजून काढला पण वाघ काही दिसला नाही. परतताना जरा Mood Off झालेला. पण काही Tension नाही दुपारपासून Core Zone च्या Safari ला जायचं होत.

  दुपारच जेवण उरकल, थोडा आराम केला. संदीपने घरून गुळपोळी आणली होती, तीच खाल्ली. ३ वाजता परत Safari ची तयारी. थोड लवकर जाव लागत, कारण Gate पाशी Gypsy ची भली मोठी रांग लागते. आम्ही पोहोचलो तशी गर्दी झालेली. जवळ जवळ ३०/३५ Gypsy होत्या. Gate पाशी आमच Online Registration दाखवले, ३ वाजले तश्या सगळ्या Gypsy तयार. आत गेल्या गेल्या सगळ्या Gypsy एकदम सुसाट. सगळ्यांची एकदम वाघाला बघण्यासाठी धावाधाव. एक मात्र खर, त्या Gypsy मधून जंगलात तुफानी वेगात फिरताना हिंदी Movie त दाखवता तस आपण कोणत्या Mission वर आहोत अस वाटायचं. 
Tiger Hunt
आम्ही तेलीया तलावा कडे आलो. ताडोबात आतमध्ये ३/४ मोठमोठे तलाव आहेत, तेलीया, तारू, पंधरपोनी. आम्ही पुढे निघालो. Guide नीलकंठ जाता जाता ताडोबाची सर्व माहिती सांगत होता. मनात वाघाची उत्सुकता वाढत होती. जर कोणत्या भागात वाघ असेल तर प्राणी एकमेकांना सतर्कतेचा Call कसा देतात, हे त्यांनी सांगीतल. त्यांची इशारा करायची पद्धत बरोबर लक्षात येते. हरीण एकतर पाय आपटतात किंवा एका विशिष्ट पद्धतीने ओरडतात. Core Zone मधेही ३०/४० किलोमीटर फिरलो पण अजूनही काही चाहूल नव्हती. तसा मध्ये Guide ला दुसर्या एका Guide कडून त्यांच्या Code Language मध्ये Signal मिळाला तशी आमची गाडी Return पांढरपोनी कडे निघाली. तलाव तसा दूर होता पण आमचा Driver ही गाडी चालवण्यात मजबूत होता. त्याने गाडी धुराडा उडवत चांगलीच पळवली. काहीवेळात आम्ही पांढरपोनी ला पोहोचलो. 
Public to see Tiger

Guide ला भेटलेला Signal बरोबर होता. तीथे गाड्यांची गर्दी झालेली. आम्ही पोहोचलो, तेव्हा कळालेली की वाघ तलाव जवळच्या कुरणात झोपलेला आहे. कुरण दूर होत, गाडी तीथ पर्यंत नेऊ शकत नव्हतो. जंगलात पर्यटकांसाठी आणी Guide साठी काही Rules & Regulations असतात त्याचं काटेकोर पणे पालन चालू होत. आमच्या थोड आधी पोहोचलेल्यांना वाघ पाण्यापासून चालत जाताना दिसला होता. सगळेजण त्याच्या उठण्याची वाट बघत होते. काहीही म्हणा राजाच्या Appointment साठी Time हा लागतोच. जवळ जवळ ३६ Gypsy, प्रत्येक Gypsy त नाही म्हटलं तरी ४ जन असे १५० लोक Camera , Binocular धरून तयार होते. पानावठ्या वर पाण्या साठी येणाऱ्या सांबर, हरीण यांनीही Call दिला. म्हणजे वाघ तीथेच होता.

 आता बस आमचे डोळे तिकडेच. मी Camera Full Zoom करून काही दिसतंय का बघितल, कुरणात काहीतरी वेगळ असल्यासारख वाटत होत पण स्पष्ट दिसत नव्हते. मनात विचार आला थोड लवकर आलो असतो तर चालत जाणार्या वाघाचे छान Pics आले असते. असो तीथे येउन भरपूर वेळ झाला होता. पण राजा काही उठत नव्हता. ६ पर्यंत मोहरली Gate ला पोहोचायचं होत. परत २०km जायचं. वाघाला उद्या बघून घेऊ अस म्हणून गाडी परत निघाली.

परतताना आम्ही सगळे शांत होतो. म्हटलं काय राव वाघ चांगला समोर होता. पण काय करणार वेळ आली होती पण ती आमच्या साठी नव्हती. जाताना कदाचित आमच्या सगळ्यांच मन तीथेच होत पांढरपोनी Lake ला वाघाच्या दर्शनासाठी. फक्त गाडी चालवण्याचा आवाज येत होता. उशीर झाला होता तश्या सर्व गाड्या भर भर धूर काढत निघाल्या. सरळ रस्त्यामध्ये उभ राहून बघितल तर नुसते धुराचे लोट आणी जाण्याऱ्या गाड्या दिसत होत्या. कोणास ठाऊक कोणत्या Mission वर निघालेल्या.
Our Tented Stay @ Tadoba

रात्रीच जेवण नीलकंठ कडेच होत. गावातली Light गेलेली मग त्याने जेवायची व्यवस्था मस्त मोकळ्या आकाशाखाली केलेली. झाडाखाली Table टाकला, Torch दिला एकदम मस्त जेवण झाल. 
Footstep of Tigress
सचिनने रात्री Resort वर आणून सोडल. झोपण्याआधी Resort च्या आवारात थोड थांबलो. रात्री तीथे मस्त वाटत होत. मुंबई वरून काही Traveler आले होते त्यांच्याशी गप्पा मारल्या. परत सकाळची Safari होती मग टाकल अंग थोडा वेळ. तीथे काही दिवस उठायचं आवरायचं आणी वाघाच्या शोधात निघायचं याशिवाय काही काम नव्हत. सकाळची Safari ही तशीच गेली, No वाघ. आतापर्यंत आम्ही तीथे हरीण, सांबर, गवा, Wild Dog, मगर, वेगवेगळे पक्षी आणी Ghost Tree एव्हड सगळ बघितल, पण वाघ काही दिसला नाही. Ghost Tree हे संपूर्ण पांढर आणी वेडवाकड वाढलेलं असत. पांढरे असल्यामुळे ते रात्री चमकते आणी दुरून भूता सारखा अनुभव येतो. एव्हड सगळ होत, वाघ काही दिसत नव्हता. सकाळी पण एकाठिकाणी वाघाची चाहूल होती पण पठ्या काही बाहेर आला नाही.

आमच्या Trip च Budget पण वाढल होत, पण रुपेश आणी संदीप ची Hope अजून होती. . . . . नाही हो म्हणता म्हणता दुपारची सफारी Book केली.
Peacock Crossing the Road
हा आता शेवटचा Chance. परत दुपारी तयार. Tadoba Hunt. Guide ला सांगितल्या प्रमाणे Binocular आणून ठेवली होती, दूर कुठे असेल तर बघण्यासाठी. आता कुठेही TimePass न करता गाडी सुसाट निघाली. आम्ही सगळे Lake गाठायचं ठरवले. गाडी भर भर जात होती. तेलीया Cross झाल, पांढरपोनी झाल. तारू पाशी आलो. Still No Clues. इथे Guide ला वाघीण चालत गेल्याच्या खुणा दिसत होत्या, त्या ठस्यांचे थोडे Pics घेतले. . . . त्यांना Follow केल पण काही फायदा नाही. आमची गाडी जंगलाचा कोपरा न कोपरा शोधत होती पण वाघ कुठे दडून बसला होता No Clues.

Driver ने भर भर सगळे Lake आणि वाट तुडवून काढल्या. . . . .  Guide ने येणारा प्रत्येक Call Use केला . . . . . आम्ही Budget वाढवून Additional Safari घेतली. . . . पण वर म्हटलो तस राजाच्या दर्शनासाठी Appointment लागते. जंगलाचा राजा आहे तो, तो त्याच्या शान मध्ये फिरतो. त्याला न कोणाची फिकीर न कोणाची डर. जंगलात आम्ही सगळे छोटे मोठे प्राणी बघीतले पण वाघ काही दिसला नाही. त्याची ही शान आणी रुबाब बघून लोक त्यामागे एव्हडे का वेडे होतात ते कळाल. वाघ पिंजर्यात पण दिसतो हो पण त्याचा घरात जाऊन बघण्यात जो थरार आहे तो कशातच नाही. . . . . इथे ३ दिवस आम्ही वाघासाठी तळ ठोकून बसलो होतो, सकाळ संध्याकाळ त्याचा पाठी धावत होतो पण पठ्या काही गावला नाही. मध्ये वेळ आली होती पण ती हुकली. पण एक न एक दिवस नक्की हा पठ्या गावणार अस म्हणून आम्ही ताडोबा ला अलविदा केल.

ताडोबा म्हणजे वाघ साक्षात वाघ. . . . . .   पुढच्या वेळी बघून घेऊ बेटा तूला.