Saturday 16 March 2019

स्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....


प्रत्येकाने शाळेत असताना एक देखावा चित्र काढलेल आहे... पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव.. बाजूला शेती.. झुळझुळ वाहणारी नदी..

खुपसार्या Animated movies मध्ये दाखवलेली गाव... किंवा आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील एक गाव.... हुंडर आणि टुरटुक अगदी तसच आहे...

हुंडर हे Nubra valley मधे आहे जीथे आपल्याला Sand Dunes म्हणजे हिमालयातील वाळवंट बघता येत... Nubra valley  मधे आल्यावर पहिल्यांदा नजरेत भरते ती Diskit येथील मैत्र्येय बुध्दा ची उंच मुर्ती... नूब्रा नदीचा खोर्याचा परिसर खुप मोठा आहे.. आम्ही मैत्र्येय बुध्दा ला आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.. पर्वतांच्या पलीकडे मावळतीला जाणार्या सुर्याची तीरपी किरणे बुध्दांच्या मुर्तीवर पडताना सुंदर दिसत होते. खरतर मैत्र्येय बुध्दा पाशी संध्याकाळी च आल पाहीजे.. इथुन wide angle photos खुप छान येतात.


आजचा मुक्काम आमचा हुंडर ला होता.. Diskit पासुन हुंडर ५/१० किलोमीटर असेल. जातानाच आपल्याला नदिच्या खोर्यात बारीक वाळूच वाळवंट दीसु लागत.. इथे Nubra नदी उथळ वाहते आणी Sand Dunes मधे तीचे खुप प्रवाह झाले आहेत.


हुंडर ला आमचा driver रिगझीन चा ओळखीतुन Galaxy Home Stay मधे रहायच ठरल.. होम स्टे चा आवार खुप मस्त आणि मोठा होता... समोर बगीचा... त्यात फुलांची.. जर्दाळु ची.. अक्रोड ची झाड... पाठीमागे यांचीच छोटेखानी शेती.. रात्री जेवताना कळाल की बनवलेल्या सगळ्या भाज्या यांच्याच शेतातल्या आहे..




हुंडर ला Duble Hump उंट आहेत.. त्यावर बसुन मी चैताली आणि क्षितीजा वाळवंटातून फिरुन आलो.. आई वडलांनी वाळवंटात पायी फिरणच पसंद केल.. उंटावर बसण तस सोप आहे पण तो उठताना आणि बसताना खुप अवघड होउन जात .. त्यामुळे भीती सोबत मज्जा ही वाटते...

या Sand Dune मधुन नुब्रा नदीचा छोटा प्रवाह गावा कडुन वळवलेला आहे... हाच प्रवाह गावातील प्रत्येक घरासमोरुन जातो... म्हणजे प्रत्येक घरापाशी नदीच पाणी... पाणी वाहत नीतळ स्वच्छ आहे.. हेच पाणी घरात वापरायला घेतात. ही pipeline नसलेली गावाची पाण्याची व्यवस्था मस्त आहे..
आता उद्या याहुन ही सुंदर आशा टुरटुक ला जायच आहे... 

Sand Dunes मधे फिरताना एकाने टुरटुक ची खुप प्रशंसा केली त्यामुळे अजुन ओढ वाढली होती..

Sunday 6 January 2019

लामा.. वाळवंट... आणि हिमशीखरांच्या प्रदेशात : लेह लडाख!!!





Don't Be Gama... In The Land of Lama's..!

(Gama was the world famous wrestler and Lama's are meditating peacefully living people)

Recently we visited the Ladhak and I heard this dialogue from our driver Rigzin....

This saying is perfectly apply to the Adventure Tourism and Trekking anywhere in the world.... Nowadays everyone wants to travel in Leh Ladhak but no one thinks about precautions and ethics in Adventure Tourism... Ladhak is the High Altitude place... Anything can happen over there bcoz of low oxygen.. people should understand this... As per saying we should not show strength as of Gama in Ladhak... Understand the situation... Understand our limits and enjoy the adventure...

                    #LehDiary #wanderlust

गेल्या कित्येक वर्षांपासून लडाखच खुळ डोक्यात होत... मागच्या वर्षी मी, माझी wife, आणि मीत्र अस bike ride plan झालेल पण काही कारणास्तव ते पण रद्द झाल.. 
लडाख फिरण्याची केव्हाची ती इच्छा मग यावर्षी पुर्ण झाली.. यावेळी पुर्ण फॕमीली सोबत प्लान ठरला होता.. 

लडाख समोर आल की पहीले डोळ्यासमोर येत ते तीथले बर्फातील घाट रस्ते... शांत नीतळ स्वभावाची लोक... सिंधू  नदी.. लामा... मोनेस्ट्रीस... आणि Indian Army.... 

लेह लडाख हा कश्मिर मधलाच पण अतीशय वेगळा प्रदेश आहे... कश्मिर  आणि हिमालय म्हटल तर बर्फ दिसतो.. पण लडाख मधील हुंडर येथे चक्क वाळवंट आणि उंट आहेत..  खुप दुर्गम भाग असुन तीथे Indian Army चा BRO ने केलेल काम कौतुकास्पद आहे.

या tour मधील लक्षात राहण्या सारखी गोष्ट म्हणजे सीमेवरिल टुरटुक या १९६४ साली पाकिस्तान सोबत झालेल्या युध्दात जींकलेल्या गावाची सफर.. तीथेच घडलेली Maratha Batalian  सोबत भेट... आणि चक्क India Pakistan Border वर खाल्लेला महाराष्ट्रीयन वडापाव...
हुंडर चा Galaxy Home stay आणि त्यांचाच बागेतील फळ भाज्यां वर केलेल जेवण..
स्तो-कर ला पहाटे पहाटे बघीतलेला हिमवर्षाव..

Dal Lake

खुप ठिकाणी वाचल आणि ऐकल होत... लेह लडाखची सफर ही खुप खार्चीक आहे...हा पुर्ण पणे भ्रम आहे... जर आपण आधी पासुन नीट माहीती घेउन प्लान केल तर ही tour खुपच pocket friendly होते... मी या टुर मधील स्पाॕट व गमती जमती वर बोलेलच पण त्याआधी याचा खर्च व प्लानींग बद्दल लीहतो..

Kargil War Memorial

Moon Land

आम्ही जुन २०१८ ला जवळ जवळ २ आठवडे लेह लडाख फिरत होतो... आम्ही फिरुन आलेले स्पाॕट : श्रीनगर, कारगील, २ दिवस लेह, २ दिवस हुंडर नुब्रा व्ह्याली आणि टुरटुक, श्योक व्ह्याली पँगोंग सरोवर, हानले, स्तो कर व स्तो मोरिरी सरोवर, मनाली आणि दिल्ली...

जाताना पुणेहून थेट श्रीनगर विमान प्रवास आणि परतीला दिल्ली वरुन स्लीपर कोच रेल्वे रिझरवेशन...
बजेट फ्रेंडली टुर मधे काही गोष्टी करायचा राहून जातात.. पण नीट प्लानींग करुन आपण त्या सगळ्या activities करु शकतो.. 

श्रीनगर म्हटल तर House Boat Stay आणि दल लेक मधुन शिकारा सफारी समोर येते..
सोनमर्ग ला बर्फातील sport activities.... 
हुंडर ला Double Hump Camel safary in dessert...
मनाली ला बीयास नदी मध्ये River Rafting... आणि काही प्रमाणात shopping  आणि  बरच काही..

Smiling Budha


Maitreya Budha

Hunder Sand Dunes
Turtuk Village

हे सगळ आम्हा ५ जणांना.. With  private innova from श्रीनगर ते मनाली... आणि प्रत्येक ठिकाणी एक चांगला stay..  प्रत्येकी २९ हजार मधे जमवून आणता आल... 

कश्मिर लडाख मनाली ही ठिकाणे फिरण्यासाठी खुप प्रसिध्द आसल्यामुळे तेथील मुख्य व्यवसाय हा Hotel and Travel tourism चा आहे.. त्यामुळे तेथील जास्तीतजास्त  hotels ही family साठी चांगलीच आहेत. त्यामुळे आम्ही बहुतेक ठिकाणचे hotel book केले नव्हते.. काही ठिकाणी online review बघुन फक्त contact करुन गेलेलो... ती hotels 3 star 5 star नव्हती पण तीथली व्यवस्था आतीशय चांगली होती...   

प्लान करताना काही tour operator कडुन quotation काढले होते... तसेच तीथे जाउन आलेल्या मीत्रांकडून देखील खर्चाची माहीती काढली... श्रीनगर लेह मनाली या full circuit   मधे वरील सगळे spot करण्यासाठी प्रत्येकी ४० ते ५० हजारांच्या वर खर्च जात होता... महत्वाची बाब म्हणजे टुरटूक, हानले, स्तो मोरिरी असे ठिकाणे त्यात नव्हती... त्यामुळे आम्ही स्वताच पुर्ण माहीती घेउन प्लान करायच ठरवल...  

लडाख मधील दुर्गम भागात फिरण्यासाठी online permit काढाव लागत.. फक्त त्यावर शिक्का लेह मधील  tourism centre  मधुन घ्यावा लागतो. परमीट चे प्रत्येकी ५०० रुपये लागतात.. तेथील tourism agents देखील आपल्याला परमीट काढुन भेटते...


बाकीची माहीती पुढील भागात...