Saturday 16 March 2019

स्वप्नांच्या पलीकडील टुरटूक आणि हुंडर....


प्रत्येकाने शाळेत असताना एक देखावा चित्र काढलेल आहे... पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव.. बाजूला शेती.. झुळझुळ वाहणारी नदी..

खुपसार्या Animated movies मध्ये दाखवलेली गाव... किंवा आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील एक गाव.... हुंडर आणि टुरटुक अगदी तसच आहे...

हुंडर हे Nubra valley मधे आहे जीथे आपल्याला Sand Dunes म्हणजे हिमालयातील वाळवंट बघता येत... Nubra valley  मधे आल्यावर पहिल्यांदा नजरेत भरते ती Diskit येथील मैत्र्येय बुध्दा ची उंच मुर्ती... नूब्रा नदीचा खोर्याचा परिसर खुप मोठा आहे.. आम्ही मैत्र्येय बुध्दा ला आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.. पर्वतांच्या पलीकडे मावळतीला जाणार्या सुर्याची तीरपी किरणे बुध्दांच्या मुर्तीवर पडताना सुंदर दिसत होते. खरतर मैत्र्येय बुध्दा पाशी संध्याकाळी च आल पाहीजे.. इथुन wide angle photos खुप छान येतात.


आजचा मुक्काम आमचा हुंडर ला होता.. Diskit पासुन हुंडर ५/१० किलोमीटर असेल. जातानाच आपल्याला नदिच्या खोर्यात बारीक वाळूच वाळवंट दीसु लागत.. इथे Nubra नदी उथळ वाहते आणी Sand Dunes मधे तीचे खुप प्रवाह झाले आहेत.


हुंडर ला आमचा driver रिगझीन चा ओळखीतुन Galaxy Home Stay मधे रहायच ठरल.. होम स्टे चा आवार खुप मस्त आणि मोठा होता... समोर बगीचा... त्यात फुलांची.. जर्दाळु ची.. अक्रोड ची झाड... पाठीमागे यांचीच छोटेखानी शेती.. रात्री जेवताना कळाल की बनवलेल्या सगळ्या भाज्या यांच्याच शेतातल्या आहे..
हुंडर ला Duble Hump उंट आहेत.. त्यावर बसुन मी चैताली आणि क्षितीजा वाळवंटातून फिरुन आलो.. आई वडलांनी वाळवंटात पायी फिरणच पसंद केल.. उंटावर बसण तस सोप आहे पण तो उठताना आणि बसताना खुप अवघड होउन जात .. त्यामुळे भीती सोबत मज्जा ही वाटते...

या Sand Dune मधुन नुब्रा नदीचा छोटा प्रवाह गावा कडुन वळवलेला आहे... हाच प्रवाह गावातील प्रत्येक घरासमोरुन जातो... म्हणजे प्रत्येक घरापाशी नदीच पाणी... पाणी वाहत नीतळ स्वच्छ आहे.. हेच पाणी घरात वापरायला घेतात. ही pipeline नसलेली गावाची पाण्याची व्यवस्था मस्त आहे..
आता उद्या याहुन ही सुंदर आशा टुरटुक ला जायच आहे... 

Sand Dunes मधे फिरताना एकाने टुरटुक ची खुप प्रशंसा केली त्यामुळे अजुन ओढ वाढली होती..

2 comments: