आता आम्ही मागे फिरून बोराट्याच्या नाळेत उतरायला सुरुवात केली. संपूर्ण दगडांनी भरलेली असल्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागत होती. या नाळेने थोडी हरीश्चान्द्राच्या नळीची आणी सांधण ची आठवण करून दिली. सोबत समीर असल्यामुळे वेळ मस्त मजेत जात होता.
अर्धी नाळ उतरल्यावर उजव्या हाताला काही bolt ठोकलेले दिसतात. इथूनच लिंगाण्याकडे जाता येत. आणी त्याच रस्त्याने खाली पाने गावात उतरता येत. आम्ही सरळ बोराटच्या नाळेने खाली गेलो. पावसाळ्यात नाळेत भरपूर पाणी असत. बोराटा आणी सिंगापूर दोन्ही बाजूने येणारा पाण्याचा लोट पुढे काळ नदीला भेटतो.
खाली आल्यावर डाव्या बाजूला गवताच्या मोकळ्या कुरणात रस्ता जातो. तो पकडायचा. तीथेच सिंगापूर नाळेतून येणारा रस्ता मिळतो. या कुरणातून बोराटा सिंगापूर ची नाळ आणी लिंगाणा स्पष्ट दीसतात. एव्हाना लिंगाणा चढणारी मंडळी वर पोहोचली होती. इथून खाली चालत गेल की सिंगापूरच्या नाळेतून येणाऱ्या ओढ्याला पकडून आपण दापोली गावात पोहोचतो.
आम्ही गावात पोहोचेस्तोवर सुर्य मावळतीला लागला होता. फटकन वळण कोंड वर जाऊन याव म्हटलं. गावातून पुढे १किमी वर वळण कोंड आहेत.
वळण कोंड हे अतीशय सुंदर ठिकाण आहे. काळ नदीच्या पात्रात तीच्या प्रवाहामुळे तयार झालेले रांजण खळगे. इथेच वरदायिनी देवी वसलेली आहे. या भागातील हे एक छोट तीर्थ क्षेत्र आहे. नदीवर एक झुलता पूलही बांधला आहे. नदी पात्रात देवीचे मासे असतात. चांगले ३/४ फुट मोठे. ते आपल्याला दिसणे आणी त्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. तीथे नीवांत वाटत होते. दिवसभरचा थकवा तिथल्या शांत आणी रम्य वातावरणात क्षणात नीघून गेला.
एका बाजूला दुर्गराज रायगड आणी दुसरीकडे लिंगाणा… मध्ये वाहणाऱ्या काळ नदीच खळाळणार पाणी आणी नीरोप घेणारे भास्कर राव…. एक रम्य संध्याकाळ झाली…
तीथून परत गावात आलो. गावातल मंदिर मस्त मोठ होत. त्याचा आवारातच सामान टाकल. रात्र तीथेच काढायची होती. शेजारच्या काकुंनाच जेवनाच सांगीतल. थंडीचे दिवस होते. आम्ही देशावरून कोकणात आलो होतो. त्यामुळे थंडीचा काही मागमूसही नव्हता. थंडी साठी आणलेले कपडे सगळे तसेच होते. भिंती ला थोडी पाठ लावली. आतून एक आवाज आला…. राव आजचा ट्रेक मस्तच झाला…
रात्रीची गावात जरा लगबग दिसली. विचारपूस केली तर कळाले की उद्या सकाळच्याला बैलांची झुंज होती. दापोलीची मंडळी त्यांचा बैलाला तयार करत होती. Live झुंज बगण्याचा चांगला मौका आला होता. वेळ भेटला तर तोही मारू असा विचार करून सगळे निद्राधीन झाले. थोड्या वेळाने कळाले गावातली कुत्री आमच्या आजूबाजूला फिरत होती. नंतर लक्षात आल…. बहुतेक आम्ही त्यांची झोपायची जागा घेतली होती. रात्री एक पिल्लू समीरच्या कुशीत येउन झोपलं होत.
सकाळी लवकरच उठलो. बाहेर जाऊन प्रातर्विधी आटपून घेतले. नाश्ता झाला. काल आम्ही उतरत होतो म्हणून उन्हाचा त्रास होत नव्हता. पण आज खरी मज्जा होती. आज आम्हाला सिंगापूरची नाळ चढायची होती. नाश्ता आटपून ब्यागेची उचलबांगडी केली आणी गाव सोडल. एक डोंगर चढून बोराटा आणी सिंगापूर च्या junction पाशी आलो. सिंगापूरची नाळ भली मोठी आहे. चांगला कस काढत होती. वाटाड्याने आम्हाला एक माहिती दिली. नाळेत एका ठिकाणी वरदायिनी देवीची गुफा आहे. सह्याद्रीतली अशी छोटी मंदिरे मस्तच असतात. शांततेचा भास होतो. नाळेचा रस्ता काही ठिकाणी चांगलाच कडेने जातो. चढताना सतर्क राहावं लागत होत. गुफेच्या आधी गर्द झाडी आहेत. तीथेच बूट काढले आणी आत दर्शनास गेलो. गुहेच्या एका कोपर्यात शेंदूर फासलेली देवी होती. गुहेवरून एक आटलेला झरा हळू हळू पडत होता. थोडा वेळ आराम करून पुन्हा सुरुवात केली. अजून मोहरीला पोहोचायला वेळ होता. गुहेच्या वर झार्यापाशी फ्रेश झालो. खाली प्रचंड मोठी valley होती. पाहून डरकीच भरायची. आता भुका लागल्या होत्या आणी पाणीही संपत आल होत. कुठे ताक भेटल तर बर झाल असत.… ही आमची इच्छा सिंगापूर गावात पूर्ण झाली. चांगले ३/३ ग्लास आम्ही रिचवले. मोहरीला बाळू मोरे कडेच जेवण केल.
एका चांगल्या ट्रेक ची सांगता झाली होती.…. दोन दिवस सह्याद्रीने भरपूर काही दिल!!!!
No comments:
Post a Comment