Thursday, 2 July 2015

घाटमाथ्याचा पहीला पाउस

पाउस घाटमाथ्यावर आला होता…. त्याची गळा भेट घायची वेळ जवळ आलेली… या मानसूनात हा अजून काही गावला नव्हता… काही सरी अंगावर झेलल्या होत्या पण रोरावत येणारा चिंब चिंब करणारा क्षणात कायापालट करणारा असा नेहमीचा अनूभव अजून या पावसाळ्यात यायचा होता…

तो कोकण किनारपट्टीला भीडून एव्हडा वर आला म्हटल्यावर आपणही थोड पुढे जायला हरकत नाही… सह्याद्रीतला पहीला पाउस अनुभवण्या सारख सुख नाही…. उन्हाने तापलेल्या कातळ कड्या वरून जे शुभ्रधवल झरे सुरु होतात… ओढे नाले पाझर तलाव दुथडी भरून वाहतात… ढगांचे पुंजके च्या पुंजके दर्या व्यापून टाकतात…. मग रानात सुरुहोतो काजव्यांचा खेळ… जणू चांदनच खाली याव आणी एका लयीत बागडाव… या निसर्गाची किमयाच भारी जो या एव्हड्या जीवाला पण स्वयंप्रकाशित करतो…

यावेळी एका अपरीचीत ठिकाणी या पावसाच दर्शन घ्याव अस ठरल…. देशातून कोकणात जाणारी घाटमाथ्या वरून एकावर एक उड्या मारत उतरणारे असंख्य जलप्रताप पूढे एकत्र होऊन एकजूटीने डोंगर दर्या कापत कापत नीघालेली कुंडलीका आणी तीची valley बद्दल खूप ऐकल होत … अंधारबन म्हणून प्रसीद्ध असलेल तीच जंगल खूप घनदाट आहे… दिवस ठरला वेळ ठरली आणी आम्ही पावसाच्या गारठ्याचा अनुभव घ्यायला नीघालो …

स्वारगेट हून सकाळची विन्हेरे ची बस पकडून ताम्हीनीतील प्लस valley च्या अलीकडच्या वांद्रे फाट्याला उतरलो… येताना मुळशीचा अख्खा परीसर पावसाने व्यापून टाकला होता… फाट्याला उतरलो तशी पावसाने उघडीप घेतलेली… म्हटल आपल्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत असणार… लोणावळ्याची वाट धरली आणी योग आश्रम पार करून पिंपरी चा पाझर तलावा पाशी आलो… अलीकडच्या point वरून आजच्या प्रवासाच दर्शन घ्यावं म्हटल पण धुक्याने हिरमोड केला… तीथे उभ राहून ऐकू येत होत फक्त कुंडलीकेच्या नृत्याविष्काराचा ताल… कदाचीत या धुक्या आडच पाउस दडून बसला असावा आपला कलाविष्कार दाखवत…

पाझर तलाव भरून वाहत होता… त्याच समोरच्या खडकावरून फेसाळत जाणार पाणी कुंडलिका valley चा साज शृंगारात भर घालत होत… वार्यावरती लहरत येणार धूक तलावाच्या सुंदरतेला खुलवत होत…

  

 

आता वेळ होती अंधारबानाची… या नावातच काय जादू आहे … डोंगर दर्या मध्ये व्यापलेलं किर्र काळोखाच जंगल … पाझर तलावाला लगट करून नीघालो… माती चांगलीच भुसभुशीत झालेली… भात पेरणीही सुरु झालेली…. थोड्या वेळातच झाडी दाट होत गेली आणी आमची अंधारबन ची सुरुवात झाली… पाउसही वयात यायला लागला होता झाडाचं दाट छत असूनही झोडपून काढत होता… बाजूच्या डोंगरावरून पाण्याचे ओहोळ वाहत यायचे आणी कुंडलीके साठी दरीत उडी टाकायचे… आम्ही त्यांना तुडवत निघालो। समोरच्या घळीतून एक पाण्याचा प्रचंड मोठा लोट खाली उतरत होता … हिरवी झाडी  काळा कातळ आणी नीतळ पाणी Combination मस्त जमून आलेल.  धबधब्याच गणितच वेगळ… पावसाच्या आणी धरतीच्या मीलनातून बेलाग कडे कापर्याना असे काही पान्हे फुटतात आणी त्याचा अंगा खांद्य वरून खेळत बागडत खाली येतात…      

 शेवाळलेल्या दगडावरून जरा सांभाळून चालावं… एकूणच निसर्ग भटकंती करताना जरा काळजी घ्यावी… निसर्गापुढे आपण खूप लहान आहोत याची तो प्रत्येक ठिकाणी प्रचीती देतो…

वाटेत ३ ते ४ मोठाले पाण्याचे लोट पार केले… या भागाला पावसाने चांगलच झोडपून काढाल होत… वाटेत अनेक झाडे पडली होती… त्यामुळे रस्ता पण नीट कळत नव्हता… चुकत माखत आम्ही ते जंगल पार केल… मोकळ्या पठारावर आल्यावर जरा चाहूल घेऊन नीट रस्ता शोधला आणी हिरडी गाव गाठल… जंगल सोडल तस आम्हाला मोकळ बघून पावसाला जास्तच चेव आलेला… हिरडीच्या शिव मंदिरात जरा विसावा घेतला… पावसामुळे समोरची पुष्करणी ओसंडून वाहायला लागली… आणी बाजूलाच ओढा खळाळत होता… थांबलो तस अंगात हुडहुडी भरली… मंदिराच्या गाभार्यात उबदार वाटत होत… पिंडीवर अखंड जलाभिषेक चालू होता… हिरडी १०/१२ कौलांच टुमदार गाव… गावात शाळा आणी सार्वजनीक शौचालय ही पोहोचल होत…

आता पुढचा पडाव भीरा धरण… इथून खाली उतरत गेल की दोन फाटे फुटतात डावी कडचा भीरा आणी उजवी कडचा नागषेत. थोड आडवत धरून अजून डावी कडच्या पठारावर गेल तर ताम्हिणी चा संपूर्ण घाट दिसतो… पावसाने थोडी चाल हळू केली आणी धूक ही बाजूला झाल… भीरा धरणा पासून ते प्लस Valley पर्यंत मस्त दर्शन झाल… समोर तर धबधब्यांची जत्राच होती… आणी खाली बघीतल तर कुंडलीकेचे पहीले दर्शन… तीथून परत फीरलो आणी मूळ रस्ता धरून भीरा गाठल…. धरणाच्या भिंती वरून बघीतल तर दोघी बाजूने एका मागोमाग एक असे डोंगरांचे कडे आणी चक्क समोर कुंडलीका Valley.

 

पहील्याच पावसात सह्याद्री मस्त खुलला होता… या मान्सून चा पहिला पाऊस जगलो आता अख्खा पावसाळा वाट बघतोय आपली…।           

No comments:

Post a Comment