Showing posts with label varadayini devi. Show all posts
Showing posts with label varadayini devi. Show all posts

Friday, 6 March 2015

बोराटा सिंगापूर लिंगाणा दर्शन वरदायिनी देवी वळनकोंड भाग २


आता आम्ही मागे फिरून बोराट्याच्या नाळेत उतरायला सुरुवात केली. संपूर्ण दगडांनी भरलेली असल्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागत होती. या नाळेने थोडी हरीश्चान्द्राच्या नळीची आणी सांधण ची आठवण करून दिली. सोबत समीर असल्यामुळे वेळ मस्त मजेत जात होता.


 अर्धी नाळ उतरल्यावर उजव्या हाताला काही bolt ठोकलेले दिसतात. इथूनच लिंगाण्याकडे जाता येत. आणी त्याच रस्त्याने खाली पाने गावात उतरता येत. आम्ही सरळ बोराटच्या नाळेने खाली गेलो. पावसाळ्यात नाळेत भरपूर पाणी असत. बोराटा आणी सिंगापूर दोन्ही बाजूने येणारा पाण्याचा लोट पुढे काळ नदीला भेटतो.


 खाली आल्यावर डाव्या बाजूला गवताच्या मोकळ्या कुरणात रस्ता जातो. तो पकडायचा. तीथेच सिंगापूर नाळेतून येणारा रस्ता मिळतो. या कुरणातून बोराटा सिंगापूर ची नाळ आणी लिंगाणा स्पष्ट दीसतात. एव्हाना लिंगाणा चढणारी मंडळी वर पोहोचली होती. इथून खाली चालत गेल की सिंगापूरच्या नाळेतून येणाऱ्या ओढ्याला पकडून आपण दापोली गावात पोहोचतो.


 आम्ही गावात पोहोचेस्तोवर सुर्य मावळतीला लागला होता. फटकन वळण कोंड वर जाऊन याव म्हटलं. गावातून पुढे १किमी वर वळण कोंड आहेत. 



वळण कोंड हे अतीशय सुंदर ठिकाण आहे. काळ नदीच्या पात्रात तीच्या प्रवाहामुळे तयार झालेले रांजण खळगे. इथेच वरदायिनी देवी वसलेली आहे. या भागातील हे एक छोट तीर्थ क्षेत्र आहे. नदीवर एक झुलता पूलही बांधला आहे. नदी पात्रात देवीचे मासे असतात. चांगले ३/४ फुट मोठे. ते आपल्याला दिसणे आणी त्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. तीथे नीवांत वाटत होते. दिवसभरचा थकवा तिथल्या शांत आणी रम्य वातावरणात क्षणात नीघून गेला. 

एका बाजूला दुर्गराज रायगड आणी दुसरीकडे लिंगाणा… मध्ये वाहणाऱ्या काळ नदीच खळाळणार पाणी आणी नीरोप घेणारे भास्कर राव…. एक रम्य संध्याकाळ झाली…

तीथून परत गावात आलो. गावातल मंदिर मस्त मोठ होत. त्याचा आवारातच सामान टाकल. रात्र तीथेच काढायची होती. शेजारच्या काकुंनाच जेवनाच सांगीतल.  थंडीचे दिवस होते. आम्ही देशावरून कोकणात आलो होतो. त्यामुळे थंडीचा काही मागमूसही नव्हता. थंडी साठी आणलेले कपडे सगळे तसेच होते. भिंती ला थोडी पाठ लावली. आतून एक आवाज आला…. राव आजचा ट्रेक मस्तच झाला…

 रात्रीची गावात जरा लगबग दिसली. विचारपूस केली तर कळाले की उद्या सकाळच्याला बैलांची झुंज होती. दापोलीची मंडळी त्यांचा बैलाला तयार करत होती. Live झुंज बगण्याचा चांगला मौका आला होता. वेळ भेटला तर तोही मारू असा विचार करून सगळे निद्राधीन झाले. थोड्या वेळाने कळाले गावातली कुत्री आमच्या आजूबाजूला फिरत होती. नंतर लक्षात आल…. बहुतेक आम्ही त्यांची झोपायची जागा घेतली होती. रात्री एक पिल्लू समीरच्या कुशीत येउन झोपलं होत. 

सकाळी लवकरच उठलो. बाहेर जाऊन प्रातर्विधी आटपून घेतले. नाश्ता झाला. काल आम्ही उतरत होतो म्हणून उन्हाचा त्रास होत नव्हता. पण आज खरी मज्जा होती. आज आम्हाला सिंगापूरची नाळ चढायची होती. नाश्ता आटपून ब्यागेची उचलबांगडी केली आणी गाव सोडल. एक डोंगर चढून बोराटा आणी सिंगापूर च्या junction पाशी आलो. सिंगापूरची नाळ भली मोठी आहे. चांगला कस काढत होती. वाटाड्याने आम्हाला एक माहिती दिली. नाळेत एका ठिकाणी वरदायिनी देवीची गुफा आहे. सह्याद्रीतली अशी छोटी मंदिरे मस्तच असतात. शांततेचा भास होतो. नाळेचा रस्ता काही ठिकाणी चांगलाच कडेने जातो. चढताना सतर्क राहावं लागत होत. गुफेच्या आधी गर्द झाडी आहेत. तीथेच बूट काढले आणी आत दर्शनास गेलो. गुहेच्या एका कोपर्यात शेंदूर फासलेली देवी होती. गुहेवरून एक आटलेला झरा हळू हळू पडत होता. थोडा वेळ आराम करून पुन्हा सुरुवात केली. अजून मोहरीला पोहोचायला वेळ होता. गुहेच्या वर झार्यापाशी फ्रेश झालो. खाली प्रचंड मोठी valley होती. पाहून डरकीच भरायची. आता भुका लागल्या होत्या आणी पाणीही संपत आल होत. कुठे ताक भेटल तर बर झाल असत.… ही आमची इच्छा सिंगापूर गावात पूर्ण झाली. चांगले ३/३ ग्लास आम्ही रिचवले. मोहरीला बाळू मोरे कडेच जेवण केल.


एका चांगल्या ट्रेक ची सांगता झाली होती.…. दोन दिवस सह्याद्रीने भरपूर काही दिल!!!!

बोराटा सिंगापूर लिंगाणा दर्शन वरदायिनी देवी वळनकोंड भाग १

 आदल्या दिवशी रात्रभर धो धो पाऊस पडला होता. ऐन डिसेंबर च्या बोचर्या थंडीत सह्याद्री न्हाऊन निघाला होता. सकाळी लवकर उठून आवरल आणी ट्रेक साठी लागणार सामान pack करून बाहेर पडतो तर काय . . . . पुणे चांगलच धुक्यात गुडूप झालेलं. यावेळी आम्ही निघालो होतो लिंगाणा दर्शनाला.

हाही प्लान भरपूर दिवसांचा डोक्यात होता. मी रुपेश समीर सोमनाथ अशी चौकडी तयार होती. रुपेश ने मला शिवाजी नगर हून उचलल गाडीला kick मारली आणी निघालो.  आमचा नाश्ता बाकी होता तो सिंहगड पायथा डोणजे ला उरकला. येत्या २ दिवसात आम्ही लिंगाणा दर्शन रायलिंग पठार बोराट्याची नाळ वरदायिनी देवी वळणकोंड सिंगापूरची नाळ अश्या भल्यामोठ्या area त भटकणार होतो. रायलिंग पाठरासाठीच शेवटच गाव आहे मोहरी. तिथल्या बाळू मोरे यांच्याशी contact झाला. त्यांनी कस यायचं . . .  गाडी कुठ पर्यंत येईल अस सगळ सांगीतल.  एव्हाना आम्ही सिंहगड घेरा डोणजे मागे टाकल होत. तीथून पाबे खिंडीतून वेल्हा आणी मग तोरण्याला वळसा घालून पुढे एकलगाव सिंगापूर मोहरी अस जायचं होत.

पाबे खिंड चढून आलो तस तोरण्याने दर्शन दिले. तो बिचारा अजूनही धगांमध्ये च लपला होता. . . . सकाळच्या कोवळ्या उन्हात आणी धुक्यात समोरची valley सुंदर दिसत होती.

 वेल्ह्याच्या पुढे साधारण १५किमी वर एका खिंडीच्या तोंडाशी सिंगापूरसाठी उजव्या हाताला फाटा फुटतो.  रुपेश ने अजून एका ठिकाण बद्दल माहीती आणली होती. "केळानेश्वर" सह्याद्रीच्या कुशीत गर्द झाडीत वसलेलं एक शिवालय. वाटेत एका गावकर्याला केळानेश्वर बद्दल विचारले. गावाकडची माणस अगदी मनमोकळी असतात. त्याने आम्हाला रस्ता नीट समजावून सांगीतला. केळानेश्वर साठी सिंगापूर फाट्या पासून अजून पुढे जाव लागत. त्या खिंडीच्या पुढला पहिलाच उजवा रस्ता सरळ केळानेश्वरला जातो. रस्ता मातीचा होता. आम्ही विचारत विचारात निघालो. सकाळी सकाळी शेतीची काम सुरु होती. त्यांचा कडून कळाल अरे मंदिर मागेच राहील. एका ठिकाणी आम्ही खाली जाणारी पायवाट बगायचं चुकलो होतो. तीथून मंदीर अगदी केळानेश्वर होत. गर्द वनराई ने वेढलेलं. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या जीर्णोद्धाराची तयारी सुरु होती. मंदिर अगदीच दाट झाडीत आहे. तीथे आत गाडी टाकताना सुद्धा थबकलोच एव्हडी झाडी. मंदिराच्या बाहेरच काही देवदेवतांच्या मूर्ती आणी नंदी विराजित होते. मंदिराच्या आवारात भरपूरशा वीरगळी दिसून येतात. मस्त वाटल तीथे २ क्षण थांबायला. हे एक unplanned ठिकाण चांगलच मनाला भावलं. या मंदिराच्या पुनर्बांधणीत त्याच दिव्यत्व टिकून रहाव एवढीच इच्छा.
 इथून एक shortcut रस्ता वरती सिंगापूरच्या रस्त्याला लागतो. तो रस्ता एका private resort साठीचा आहे. Resort आणी plotting इकडे पण सुरु झालेत. टेकडी वजा घाटाचा रस्ता चढून आम्ही वरच्या रस्त्याला आलो. माहीती प्रमाणे एकालगाव सिंगापूर पर्यंत चा रस्ता व्यवस्थित आहे. पण पुढे मोहरी साठी जास्त बिकट वाट आहे. आम्ही निघालो डोंगराला वळसे घालत घाट चढत. मध्ये एकाठिकाणी सपाटीवर लिंगाण्याच पाहील दर्शन झाल. तो एकमेकाद्वितीय सुळका आकाशात झेपावत होता. त्याचा पल्याडच दुर्गराज खुणावत होता.

थोडी फोटोगिरी केली आणी गाडी ला टांग मारून वाट धरली. पुढे डाव्या हाताला खाली सिंगापूर रहात. माहिती साठी सांगतो. विल्ह्याहून सिंगापूर पर्यंतची ST महामंडळाची बस आहे. आम्ही सरळ निघालो आणी मोहरी ला बाळू मोरेंच्या आवारातच गाडी लावली.  यांचा कडे भटक्यांसाठी राहणे जेवण आणी वाटाड्याची सोय होते. जेवण लागे पर्यंत गाव फिरून आलो. मोहरीच्या बाजूने रायगडास जाण्यास भरपूर वाटा आहेत. यातील बोराट्याची अवघड प्रकारात मोडते. ही हरिश्चंद्र गडाच्या नळीच्या वाटे प्रमाणे अखंड दगडाने भरलेली आहे. जेवण उरकल्यावर आम्ही मुख्य कामास सुरुवात केली ज्याची कित्येक दिवसापासून वाट बगत होतो. लिंगाणा दर्शन. बाळूचा मोठा भाऊ वाटाड्या म्हणून होता.

 गावातून अंदाजे अर्ध्या तासात आपण रायलिंग पठारावर पोहोचतो. पठाराच्या अलीकडेच एक दगडाने भरलेली घळ दिसते तीच ही बोराट्याची नाळ. वाटेत चुकायची शक्यता नाही. सगळी कडे मार्किंग केलेलं आहे. जस रायलिंग कडे कूच करत होतो तस लिंगाण्याची भव्यता दिसून येत होती. रायलिंग वरून लिंगाणा जो दिसतोना तो अगदी अप्रतीम. अगदी मोठा सरळ ताशीव कडा. लिंगाणा किल्ला म्हणजे सह्याद्रीचा दागिनाच. लिंगाणा चढण्यासाठी Rock Climbing करता आल पाहिजे. लिंगाण्याला बघून आम्ही इथेच हात जोडले. दुसरा एक group लिंगाण्यावर चढाई करत होता. लिंगाण्याच्या उजव्या बाजूला पाने गाव आणी डाव्या बाजूला दापोली आहे.

 नेहमी प्रमाणे रुपेश ने इथे महाराजांची घोषणा दिली. महाराजांच्या जयजयकाराचा आवाज लिंगाण्या वर घुमला.  आमच्या घोषणेला लिंगाण्यावर चढाई करणाऱ्या group नेही प्रतीसाद दिला. आम्ही वेगवेगळे group जरी असलो तरी सह्याद्री आणी शिवाजी या दुव्याने जोडले गेलेलोय. संपूर्ण घोषणा होई पर्यंत त्यांनी त्याचं काम थांबवलेल.



सलाम!!! सलाम त्या राजाला…