Travel To Lok Biradari Prakalp:
दुसर्या दिवशी सकाळी सकाळीच आमची गाडी हेमलकसा कडे निघाली. चंद्रपूर पर्यंत state highway आहे. Highway वरून गाडी चांगली सुसाट निघाली होति. सकाळ असल्यामुळे खिडकीतून छान थंड हवा येत होति. नुकताच सूर्योदय झाला होत. त्या सुर्यानारायाना कडे बघून विधार्भातील गरमीची आठवण झाली आणि सकाळचा तो थंड वारा जास्तच हवाहवासा वाटू लागला. वाटेत एका ठिकाणी जुमडे काकांनी गाडी नाष्ट्या साठी side ला घेतली. तीथे सगळ्यांनी १/१ plate पोहे टाकले. इकडे पोह्यांचा सोबतीला मठ्ठा होता. What a combination? वाटेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा boundary वर वैनगंगा नदी लागते. पात्र प्रचंड मोठ होत आणि पाणी एकदम crystal clear. छान view होता तो. गाढचीरोली मध्ये entry केल्यावर येथील नक्षलवादावर अनेक news ऐकल्या होत्या. पण जुमडे काकांचा बोलण्या प्रमाणे काही problem नव्हता. वाटेत १/२ गावात CRPF चे जवान तैनात होते. रस्त्यात जुमडे काकांना त्यांचा बाबा आमटे आणि तेथील experience विचारला. ते ४० वर्षा पासून आनंदवनात कार्यकर्ता म्हणून काम करायचे. त्यांचाशी बोलून मनात म्हटलं बर झाल आश्रामातालाच driver केला, तेवढीच जास्त माहिती भेटते. जस जस हेमलकसा जवळ पोहोचत होतो तस जंगल जास्तच घनदाट होत होत. हे जंगल पूर्ण पणे सागाच्या आणि बिडीच्या पानांच्या झाडाचे आहे. त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड होते. ह्या जंगलात मोहाची झाड पण भरपूर प्रमाणात आहेत. मोहाचा फुलापासून दारू बनवतात. येथील आदिवासी या फुलांची विक्री करतात. रस्त्याने जागोजागी मोहाच्या फुलांचा सडा पडला होता. दारू साठी प्रसिद्ध असलेली हि फुले आम्ही पण जरा taste करून बघितली.
Mohache phul.
चंद्रपूर नंतर आलापल्ली हेच एक मोठ गाव. इकडचा घरांसाठी लाकडांचा जास्त प्रमाणात वापर होतो. मस्त शेणाने सरावलेले घर,त्याला लाकडाचे छप्पर आणि लाकडाचीच बनवलेली compound. अशी घर मस्त दिसतात. अल्लापल्ली नंतर एक नदीचा पूल लागतो. आता हा पूल बांधलेला आहे पण आधीचा काळात पूल नव्हता तेव्हा पावसाळ्यात हेमाल्कासाचा संपर्क तुटायचा. या साठी पुलाच्या अलीकडच्या पाड्यात हेमाल्कासाचा एक छोटासाच आश्रम तयार केला होता. त्याचा वापर संपर्क तुटलेल्या काळात राहण्यासाठी आणी समान ठेवण्या साठी करायचे.
११ वाजेच्या सुमारास आम्ही हेमाल्कासास पोहोचलो. Gate मधून आत गेल्यावर लगेच डाव्या हाताला तपासणी साठी आलेले माडिया गोंड आदिवासी होते. आत गेल्यावर पहिले सचिन ला भेटलो. त्याने आम्हाला रूम दाखवल्या आणि १२ वाजता बेल वाजल्यावर जेवायला कुठे यायचे ते सांगितले. आमचा रूम चा बाजूलाच प्रकाश आमटे यांचा बिबट्या होता. प्रकाश दादाचं प्राणीप्रेम तर सगळ्यांना माहितच आहे. पण आम्ही बिबट्याला पिंजर्यातून च पहिले. बेल वाजली तस आम्ही जेवायला गेलो. Mr. & Mrs. दिगंत आमटे आमचा सोबतच जेवायला बसले. येथील एक पद्धत छान होती. सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी जेवण बनते. आणि स्वावलंबी पणा इथेही दिसतो. जेवण झाल्यावर प्रत्येकाने आपापली ताट वाटी स्वतः धून ठेवायची. गरम जास्त होत असल्यामुळे सचिन दादा आम्हाला दुपारून प्रकल्प दाखवणार होता. आम्हीही प्रवासाचा शीण काढण्यासाठी थोडावेळ आराम केला. दुपारून साचीने संपूर्ण प्रकल्प दाखवला.
sachin explaining the project.
हेमलकसा बद्दल थोडेसे :
गाढचीरोली मधील भामरागड भागात राहणारी माडिया आणि गोंड हि सर्वात मागास जमात. प्रवाह पासून तुटलेलेशिक्षणाचा काही गंध नसलेले, घालायला कपडे नसलेले असे हे आदिवासी. त्यांचा आणि प्राण्यांचा राहण्यात काहीच फरक नव्हता. इथे रोगराई प्रचंड प्रमाणात होती. त्यांची परिस्थिती बघून बाबांना या ठिकाणी काम करावेसे वाटले; या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी प्रकाश आमटे यांनी सांभाळली. कपडे घातलेल्या माणसापासून दूर पाळणाऱ्या या लोकांना आपलेसे करण्यात प्रकाश दादाचा मोलाचा वाटा आहे. येथे त्यांचा आरोग्य सेवे सोबतच त्यांना शिक्षणही दिले जाते. त्या साठी आदिवासी मुला मुलींसाठी शाळा व वसतीगृहे आहेत. महत्वाची बाब म्हणजे येथून शिकलेले काही विद्यार्थी doctor आणी engineer झालेत. काही विद्यार्थी sports मध्ये state आणि nationals पर्यंत पोहोचलेत.
प्रकल्पा पाठीमागेच ३ नद्यांचा संगम आहे. प्रकल्प बघून झाला होता आणी संध्याकाळची वेळ होती. हीच वेळ साधून आम्ही संगमावर गेलो. भामरागड हे महाराष्ट्राचा boundary वर आहे. संगमापाशी आंध्रप्रदेश आणी छत्तीसगढ राज्यांचा सीमा येतात. संगमाच ठिकाण मोठ आहे. भामरागड area त प्रदूषण नसल्यामुळे नद्यांच पाणी एकदम स्वच्छ आणी पारदर्शक आहे. नद्या उथळ असल्यामुळे आम्ही पाण्यात गेलो.
Me @ Sangam
We All looking @ sunset.
With Jumade Kaka
On the Sangam bank
Transport through river.
सूर्यास्ताची वेळ होत चालली होती. सोनेरी सूर्यप्रकाशात पाणी आणी नदीपात्रातील रेती चमकून निघाली होती. नदी पात्र खडकाळ आहे. आम्ही दगडा दगडा वरून संगमाच्या मध्यभागी गेलो. तीथून तिन्ही बाजूचा प्रदेश बघता येत होता. फोटोग्राफीसाठी मस्त जागा होती ती. शहरी कोलाहाला पासून दूर जंगलात आमटेंच्या सानिध्यात बघितलेला हा सूर्यास्त अवर्णनीय आहे. नदी पात्रा पाशी झाडा जवळ एक बसण्यासाठी जागा आहे. तीथे बसून हा निसर्गाचा आनंद लुटण्यात काही औरच मजा आहे. तीथे थोड फोटो session झाल्यावर जुमडे काका आम्हाला भामरागड शासकीय विश्रामालाया जवळ दुसर्या नदी पात्रा जवळ घेऊन गेले. तीथे गावात काम करणाऱ्या छातीस्गढ मधील लोकांची परत त्यांचा राज्यात जायची लगबग सुरु होती. एका छोट्या नावेतून ही मंडळी आपापल्या साइकलि पलीकडे वाहून नेत होती. तीथे थोडावेळ घालवल्यावर आम्ही सुद्धा परतीचा प्रवासाला निघालो.
भाग १ भाग २ भाग ४ continue …।
No comments:
Post a Comment