Monday, 21 April 2014

आनंदवनातल्या प्रकाशवाटा भाग 1

Someone said that "Never lose an opportunity of seeing anything that is Beautiful; That is Extra-ordinary;"

I and my mates Rupesh, Sandeep, Vikas always has an obsession for seeing beautiful and unusual places. Hence we planned trip to Amte's place Anandvan & Hemalkasa.

As Dr. Vikas Amte said in talk its a journey from Stone to Milestone.


बाबा  आमटे  विषयी  आता  पर्यंत  खूप  काही  ऐकल  होत. साधना ताई चा "समिधा " मधून  ते प्रत्यक्ष  भेटले होते . त्यामुळेच आमच खूप दिवसापासून या नवीन युगातील तीर्थ क्षेत्रांना भेट दयायचा विचार चालू होता . माणस आयुष्यात निस्वार्थी मनाने काय काय करू शकतात  हे प्रत्यक्षात बघायचं होत. त्याचं काम हे फक्त कुष्ठ रोगी साठी मर्यादित न राहता अंध , अपंग, वृद्ध आणि समाजातील वंचित , दुर्लक्षित आणि मागासलेल्या घटकांपर्यंत पोहोचलेल आहे, विकास  आणि प्रकाश आमटे ते अजून पुढे घेऊन जात आहेत. 

बाबा ज्यांना गांधीजीनी "अभय साधक" हि पदवी दिली त्यांनी अगदी अपघातानेच महारोगी सेवा समितीची स्थापना केली. मागे December 2013 मधे Doctor प्रकाश आमटे पूण्यात आले होते त्यांचा "प्रकाशवाटा" पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या प्रकाशनासाठी, तो कार्यक्रम बघितल्यावरच रुपेश आणि माझ fix ठरलेलं की आपण लवकरात लवकर आनंदवन आणी हेमलकसा  ला जाऊयात. Internet वरून माहिती काढली आणी अजून कोन  कोन interested आहे ते  check केल. संदीप आणी विकास तयार झाले. आणि एवढ्या दूर जातोय तर ताडोबालाही plan मध्ये include केले, लगे हातो बाघ भी देखा जाये. कारण जंगलाच्या राजाला आतापर्यंत पिंजर्यातच बघितले होते, त्याला प्रत्यक्ष त्याचा राज्यात बघायची इच्छा होती. 

Travel Planning  :

आनंदवन आणी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा दोघांचा website वरून सगली information भेटते. (http://www.anandwan.in, http://www.lbphemalkasa.org.in) आणी आम्हाला आनंदवनातून श्री सीताकांत प्रभू आणी हेमाल्कासातून सचिन यांची plan करताना खूप मदत झाली. त्यांचाशी बोलल्यावर कळाले कि आनंद्वानाहून हेमलकसा जायला direct बस नाही आहे. वारोरयाहून अहेरी or अल्लापाल्लीची बस पकडायची आणी तेथून भामरागडची. भामरागडचा अलीकडे जवळच हेमलकसा प्रकल्प आहे. Break journey ला ७ ते ८ तास लागतात. आम्ही उन्हाळ्यात जाणार होतो आणी trip schedule थोड tight होत म्हणून कॅब book करायचं ठरलं. प्रभू काकाकडे inquiry केल्यावर विजय  जुमडे यांचा बद्दल कळले. विजय जुमडे हे आनंदवनाचे च कार्यकर्ते होते. आणी ते side by side transport चा business चालवतात. त्यांच्याशी जरा route, time, per KM rate या वर खूप वेळ हुज्जत घालून शेवटी गाडी ठरवली. 

On The Way To Anandwan:
 
आनंदवन हे वरोरा तालुक्यात येते. वरोरा रेल्वे स्टेशन पासून फक्त ५km वर आनंदवन आहे. मुंबई वरून सेवाग्राम Exp ने आपल्याला वारोऱ्या पर्यंत पोहोचता येते. (Make sure you seat in Ballarshah bogie. There are 2 extra bogies attached to Sevagra Exp which split from Wardha). आम्ही पुण्याहून सकाळी Deccan Queen ने निघालो. २. ३० तासात राणीने CST ला touch केले. CST वरून सेवाग्राम exp दूपारी ३ ला होति आणी तसे आमचा कडे ४ तास होते. म्हटल चला जरा मुंबापुरी मध्ये फेरफटका मारून येऊ. CST आणी आजूबाजूचा परिसरात खूप जुन्या buildings आहेत इंग्रजांनी बांधलेल्या. युरोपीअन वास्तुशास्त्र पद्धतीने बांधलेल्या या building बघायला छान वाटतात. दुपारच जेवण झाल्यावर CST बाहेरच असलेल्या आझाद मैदानावर मुले cricket खेळत होती ते बघत बसलो. आझाद मैदानावर आल्यावर शाळेत शिकलेल्या इतीहासाची आणी स्वातंत्र्य चळवळीची आठवण आली. ३ वाजले तसे आम्ही वारोऱ्या कडे प्रयाण केले. Train मध्ये काय time pass म्हणून आमचा नेहमीचाच गड किल्ल्यांचा गोष्टींचा फड सुरु झाला.  मागे केलेले ट्रेक पुढे करायचे ट्रेक planning इत्यादी इत्यादी . . . 

For your information सेवाग्राम exp सकाळी ४ वाजता वर्ध्या ला बल्लार शाह चे २ डबे सोडून पुढे नागपूर ला जाते. नंतर ३ तासांनी बल्लार शाह कडे जाणाऱ्या Train ला हे डबे जोडतात, तो पर्यंत वर्ध्या वर डब्यामध्ये च आराम. 
वरोरा जस जवळ येऊ लागल तस आनंदवन ची ओढ अजूनच वाढू लागली. चंद्रपूर जिल्हा हा Thermal Power Plant आणी Coal Mines साठी प्रसिद्ध आहे. त्या भागात Train ने Entry केल्या वर Thermal Power Plants आणी  Coal Mines मुळे वातावरणात बदल जाणवत होता. वारोर्याला जुमडे काकाचा मुलगा हर्शल घ्यायला आलेला.  आणी थोडयाच वेळात आनंदवन महारोगी सेवा समीती च्या कामानीने आमचे स्वागत केले. 

भाग २  भाग ३ भाग ४  continue . . . .

1 comment: