प्रकल्पावर आलो तेव्हा जेवायला अजून अवकाश होता म्हणून आम्ही रूम वर आलो. दिवसभराचे फोटो बघत होतो तोच कानावर गाण्यांचा आवाज पडला "इतनी शक्ती हमे दे न दाता …… ". वसतीगृहातील मुली त्यांचा रोजचा सवयी प्रमाणे संध्याकाळी प्राथना म्हणत होत्या. गाण्याचा सूर ऐकून मी आणी रुपेश पळत पळतच वासातीगृहापाशी पोहोचलो. सगळ्या मुली एकसुरात च प्राथना म्हणत होत्या. त्यांनी माडिया भाषेतही काही गाणी म्हटली ते काही कळले नाही पण ऐकायला बरे वाटले. प्रत्येक प्राथाने नंतर १/१ मुलगी उठून आजच दिनविशेष आणी ठळक बातम्या सांगत होत्या. हे सगळ बघून शाळेतले दिवस आठवले. एक छान संध्याकाळ गेल्याचा आनंदात आम्ही जेवलो आणि झोपलो. उद्या जगन्नाथ भाऊ आणी विलास मनोहर जे प्रकल्पाचा अगदी सुरुवाती पासून होते ते माहिती देणार होते. रात्री झोपताना विधार्भाच्या गर्मी ने थोडा (जरा जास्तच …) त्रास दिला;
सकाळी सकाळी आमचा रूमचा समोरच असणाऱ्या बदकांच्या आवाजामुळे जाग आली. रूम समोरच बदकांसाठी तळे केले होते. त्यात ही बदक दिवसभर खेळत बसायची. सकाळच्या थंड हवेत आणि कोबड्या ऐवजी बदकांच्या आवाजाने आम्ही उठलो. आवरून आम्ही बाहेर शाळेच्या पटांगण वर आलो. तीथे शाळेचे मूल मुली warmup excersize करत होते. त्यांना बघून मी आणी रुपेशनेही single आणी double Barr वर हाथ आजमावला. त्यांना बघून आम्हालाही जोश आला होता पण नाश्त्याची वेळ झालेली म्हणून आवरत घेतलं.
Charming girls
Warmup Session
जगन्नाथ भाऊ आमची वाटच बघत होते. आमचा बरोबर आता मुंबईचा senior citizen चा एक group पण join झाला. त्यांचा बरोबर प्रकल्पाची पुन्हा एकदा वारी झाली. त्यांनी अगदी सुरुवाती पासून माहिती दिली. आदिवासींचे राहणीमान, त्यांचा श्रद्धा अंधश्रद्धा, बाबांनी येथे येण्या मागच कारण, सुरुवातीला भेडसावले ले प्रश्न, आताची परिस्थिती.
Jagannath Bhau Addressing.
School
Botul
Vilas Manohar( writer of Negal)
Words by जगनाथ भाऊ :
- येथील आदिवासींमध्ये लग्न समारंभात मुली कडच्या ना जास्त मान असतो. इथे स्त्रीप्रधान संस्कृती आहे. चला निदान आदिवासिमध्ये तरी स्त्री चे महत्व आहे. आपल्या शहरी लोकांना केव्हा समजेल देवजाणे.
- इथे दरवर्षी Switzerland हून doctor चा एक group येतो. आणी आदिवास्यांवर critical operations करतात अगदी मोफत.
- आदिवास्यांकडे काही ठेवायला नसल्यामुळे त्यांचा medical record hospital मधूनच maintain केला जातो. इथे प्रत्येक गावांच्या नावाने box बनवून त्यात त्या गावातून येणाऱ्या माणसाचा paper alphabetical order ने ठेवला जातो. अशाप्रकारे इथे २०० हून अधिक गावांचा record आहे.
- पहिले शिकायला तयार नसणारी हि मुले आता इथल्या शाळां न house full चा board लावावा लागतो. आता कुठे बदलाचे वारे फिरायला लागले आहे.
- भाऊंनी आम्हाला एक जागा दाखवली त्याला "बोटुल" अस काहीतरी म्हणतात, हे आदिवासींचे समाज मंदिर आहे. इथे गावातील सगळे सामाजिक कार्यक्रम व बैठका होतत. अगदी लग्न कार्या पासून ते उत्सवा पर्यंत.
आमटेंचे प्राणीमात्र :
अनिकेत दादा आमची वाट बघत होता. त्याने सगळ्यांशी चर्चा करून नंतर प्राणी दाखवायला नेले. इथे आदिवासी जेवण्यात कोणताही प्राणी खायचे. त्यामुळे या भागात शिकारीचे प्रमाण जास्त होते. हे थांबवण्यासाठी आमटे नी त्यांना शेती करायला शिकविले. आणि जखमी आणी प्राण्याचा बछड्या ना स्वतः सोबत ठेवले. भरपूर शे प्राणी हे अगदी जन्मा पासून इथेच आहे. ते यांचा मुलांबरोबरच वाढलेत. प्रकाश दादांची आणि प्राण्यांची एव्हडी मैत्री आहे हे आता पर्यंत ऐकले होते आता प्रत्यक्ष पाहत होतो. आमटेंचे लहान मुल तर त्यांचा सोबत खेळतात. असो इथे हरीण, सांबर, मगर, मोर, अजगर, धामण, घुबड, शेकरू, अस्वल, सालीन्द्री आणि बिबट्या असे सर्व प्रकारचे प्राणी आहेत. अनिकेत दादा ज्या सराईत पणे बिबट्या बरोबर होता ते पाहून थक्कच झालो. पिंजर्याचा दरवाजा जसा उघडला तसा बिबट्या बाहेर आला आणी अनिकेत ला चाटू लागला.
आता परत फिरण्याची वेळ आली होती. This journey is never ending.
तिथून निघालो ते आनंदवन आणी लोक बिरादरी प्रकल्पाच्या छान आठवणी घेऊन आणी आमटे family आणी त्यांचा कामाला salute करून.
आता Next ताडोबा …….
भाग १ भाग २ भाग ३ continue …।
No comments:
Post a Comment