दुर्ग दुर्गेश्वर रायगड, शिवकोट रायगड…. हिंदवी स्वराज्याचे तीर्थक्षेत्र रायगड!!!!!
दुर्गराज रायगड आणी टकमक टोक. |
"Fort Raigad is much more than a mere tourist spot. It is sacred place of piligrimage, which has left impression of the grand vision of Hindavi Swarajya as cherished by Chhatrapati Shivaji Maharaj.."
British has also defined the fort Raigad as "The Gibraltar of East"
रायगड प्रदक्षिणा…माझी खूप दिवसापासुंची इच्छा होती.…. शिवरायांचा रायगड बघणे पण बाकी होते. जशी मंदिरात जाऊन देवाच दर्शन घेतल्या नंतर त्याला प्रदक्षिणा मारल्या शिवाय देवाच दर्शन पूर्ण होत नाही… अगदी त्या प्रमाणेच महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या रायगडला नुसतं जाऊन न बघता त्याच्या सभोवताली फिरून प्रदक्षिणा मारल्या शिवाय स्वराज्याच्या राजधानी चे महत्व कळत नाही आणी त्या शिवाय रायगड दर्शनही पूर्ण होत नाही.
प्रदक्षिणा मारताना रायगड नेहमी आपल्या समोर राहतो. त्याची भव्यता… त्याची खडी भिंत… घनदाट जंगल… आजूबाजूला पसरलेल्या पहाडा मधले कावळ्या बावळ्या, लिंगाणा, कोकणदिवा, असे संरक्षक किल्ले आणि कोठूनही वर चढण्यास अवघड असा रायरीचा डोंगर… यासाठीच महाराजांनी कदाचीत राजधानी साठी याची नीवड केली असावी…
नेहमी प्रमाणे रुपेश आणि मी प्रदक्षिणेसाठी केव्हा पासून वाट पाहत होतो.
२०१४ चा राज्याभिषेक दिन आम्ही target केलेला, पण काही कारणास्तव तो बेत
रद्द करावा लागला. मग जूनच्या शेवटच्या weekend ला मोहीम हाती घ्यायची असा
वटहुकूम काढला. Friday ला रात्री प्रवास करून Saturday प्रदक्षिणा मुक्काम
वरती रायगड आणि Sunday रायगड बघून परतीची वाट पूणे असा साधारण Plan होता.
Swargate हून रात्री १० ची शेवटची २X२ एशियाड पकडायची होती. ऑफिसातून येउन सगळ आवरून जेवण करून Swargate गाठायचं होत. रुपेश पहिले आला आणी गाडी लागली आहे बघून गाडीत चांगली जागा पकडून ठेवली. पण सुखाचा प्रवास आमच्या नशिबात नव्हता. आमची गाडी (आदरार्थी बहुवचन … Talking about myself… :) ) नेहमी प्रमाणे उशीरा पोहोचलो. आणि रुपेश ला परत सगळ सामान काढून ठेऊन तासभर माझी वाट बघत बसावी लागली… नंतर रात्री १२ ला खेड कडे जाणारी via महाड बस आली(लाल डब्बा) तीच्यात भली मोठी गर्दी… आम्हाला मागची Seat भेटली. वजनदार ब्यागा उचलल्या आणी महाड पर्यंतचा प्रवास ST च्या मागच्या चाका बरोबर उडया मारत सुरु झाला. सकाळी ३ ला महाड ला पोहोचलो. झोप तर काही झाली नव्हती. पाचाड साठी Enquiry केली तर एक बस लागली होती(लाल डब्बा). ती ४ ला निघणार होती. रिकामी होती… म्हणून जाऊन झोपावं म्हटल पण थोड्या वेळातच डासांनी हैराण केल. ५ ला पाचाड आल. रात्रभर झोप नव्हती आणी थोड्यावेळात दिवस उजाडणार म्हणून गावातील देशमुखांच्या हॉटेल समोर थोड अंग टाकल. सकाळी सकाळी हॉटेलच्या आवरण्याच्या आवाजाने जाग आली… डोळे तसे सुजलेलेच होते. आवरल हॉटेलात चहा नाष्टा सांगितला आणि रायगड कडे कूच केले.
दगडू , रुपेश आणी वरती महादरवाजा |
रायनक स्मारक |
कावळ्या बावल्या |
टकमक |
विसावा घेऊन थोडी photography झाल्यावर पूढे निघालो. खालून पाहता टकमक ची भव्यता आणि सरळ पाषाणातील कडा भयंकर वाटत होता. कडेलोट साठी निवड अचूक होती. वाटेत पुढे एक आदिवासी पाडा लागला. इथूनच दूरवर लिंगाण्याचे पहिले दर्शन झाले. लिंगाण्याच सरळ टोक आकाशात घुसल होत. आम्ही सोबत आणलेलं chocolate biscuit त्या मुलांना दिले. त्यांची एक चांगली गोष्ट निदर्शनास आली. Sharing. Chocolate Biscuit ची पिशवी देताच त्यांनी मुलांना सांगीतले वाटून खा. खरच Share करण्यात वेगळीच मजा असते.
लिंगाणा दर्शन |
कोकम |
वाघोली खिंड |
जंगल वाढल तस डास किडे जास्त मागे लागले.… आणि खिंड ही चांगलाच दम काढत होती. मध्ये मध्ये Stop घेत घेत आम्ही ती खिंड चढलो. प्रचंड घाम काढला तीने. त्यात डास त्रास द्यायला होतेच. रुपेश ने ODOMOS लावलं सगळ्या अंगावर पण डासांना काही झालंच नाही.
आता आम्ही भवानी कड्या खाली होतो. इथून उतार होता. समोर वाघोली गाव दिसत होत. थोडा विसावा घेऊन पुढे उतरणीला सुरुवात केली. Packed Lunch होता… भूक पण थोडी लागली होती. पण जेवायला चांगली जागाच नव्हती. आणि पाणी पण संपत आलेलं. पुढे चालू लागलो. आता आम्ही अर्धी रायगड प्रदक्षिणा पूर्ण केलेली. आता आम्ही रायगड चा दुसर्या बाजूला आलेलो. थोड जंगल cross करून मोकळ्या जागी आल्यावर आम्हाला काळकाई आणी पोताल्याचा डोंगर दिसायला लागले. हाच तो पोताल्याचा डोंगर. सरळ मार्गाने रायगडावर विजय मिळवता येत नव्हता. आणि गडास वेढा देऊनही काही फायदा नव्हता. त्याच वेळी मराठी सेनेतील काही गाद्दरानी ब्रीटीशाना तोफा पोताल्याचा डोंगरावर नेण्यास मदत केली. आणि तेथून दारुगोळा कोठारावर तोफेचा मारा केला.
वाघ दरवाजा |
इथे काळकाई देवीच अगदी छोट मंदिर आहे. पाहताक्षणी समाजातही नाही. पण फुले ठेवली होती. त्याने समजले. आता इथून पुढे बैलगाडी रस्ता होता.… थोड चालल्यावर रायगड Rope way दिसायला लागला. आणि प्रदक्षिणा पुर्तीची चिन्हे दिसायला लागली. हिरकणी वाडीत एका हॉटेलात जेवनाच आणि अंघोळीच सांगीतल. आणी चित्त दरवाजा पर्यंत जाऊन प्रदक्षिणा पूर्ण केली….
महाराजांच्या गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सह्याद्रीतील गिर्यारोहणाचे एक महत्वपूर्ण तप आम्ही पूर्ण केल होत.
आता पुढे रायगड भ्रमंती साठी नीघायचे होते…
No comments:
Post a Comment