Tuesday 14 October 2014

रतनगड ते हरिश्चंद्रगड via कात्राबाई पास भाग १

अगदी सुरुवातीला या ट्रेक बद्दल वाचले होते. तेव्हा पासूनची इच्छा होती. मध्ये रतनगड आणि हरिश्चंद्रगड स्वतंत्र करून झालेले. पण मधल्या कात्राबाई पट्ट्याचा काही योग नाही आला. म्हणूनच या परिसरात भटकंती करावी असा वटहुकूम काढला. नवरात्री मधला वीकेंड ठरवला. आणि TTMM ट्रेक करायला मावळेही तयार झाले. मी शुक्रवारी रात्री पुणेहून नाशिक इगतपुरी असा प्रवास केला आणि बाकी मंडळी थेट इगतपुरीला भेटली.

वेगवेगळे आलो असलो तरी आम्ही सगळे सकाळी ४ ला इगतपुरी touch होतो. तिथून सकाळी ५ ची शेंडी साठी बस होती. तोपर्यंत बस stand वर डास मारत बसलो. रात्रीच्या प्रवासामुळे कोणाचीही झोप झालेली नव्हती. म्हणून बस मध्ये सगळ्यांनी separate seat पकडून डुलक्या काढून घेतल्या. पण जशी उजाडतीची किरणे लागली तस सह्याद्री च सौंदर्य दिसायला लागल. खाली उतरलेले ढग…… कोवळ्या किरणांमध्ये चमकणारे दवबिंदू. आणि उजाडतीच्या रंगात रंगलेले आकाश. चालू बस मधून ते द्रुश्य कॅमेरा मध्ये घेण्याचा मोह काही आवरला नाही. नवरात्री चे दिवस होते. बस मध्ये थोडी गर्दी हि होती. ही सगळी मंडळी कळसुबाई ला देवीच्या दर्शनासाठी उतरली. तेथून थोड्याच वेळात शेंडी ला आलो.
भंडारदरा धरण

सकाळची वेळ होती. गाव तस अजून पूर्ण जाग व्हायचं होत. समोर एक जीप वाला होता. रतनवाडी बद्दल विचारले. पैसे ऐकून आम्ही शांत बसलो. जेट्टी बोट अजून यायला time होता म्हणून धरणावर आलो. Backwater पूर्ण धूक्यात होत. भांडारदर्याला आता पर्यंत भरपूर दा आलो होतो. पण सकाळच हे सौंदर्य प्रथमच बघत होतो. 
 वेळेचा सदुपयोग म्हणून अंघोळ करावी असा विचार केला. स्विमिंग पूल आणी नदी मध्ये याआधी हात आजमावला होता. धरणात पहिलीच वेळ होती. सकाळची थंडीही बोचत होती पण जस पाण्यात शीरलो तस उबदार वाटायला लागल. तीथे स्वीम्मिंग आणी फोटोग्राफीच कौशल्य दाखवल्या नंतर परत stand कडे आलो. नाश्ता केल्यावर गाडीवाल्याशी थोडी bargaining करून रतनवाडी कडे निघालो. रस्ता मस्त पूर्ण धरणाला वळसा घालून जातो. वाटेत अमेय ने चालू गाडीत माझा एक मस्त फोटो घेतला.
अमृतेश्वर मंदीर आणी पाठीमागे रतनगड

रतनवाडीस आलो. पुष्करणी चांगलीच पाण्याने भरलेली होती. पण उनाड पर्यटकांनी त्यातही बाटल्या आणी कचरा केला होता. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना त्याच पावित्र्य राखायच कोणालाही वेळ नाही. रतनवाडी च अमृतेश्वर मंदीर आणी पुष्करणी भारतीय स्थापत्य कलेचा एक सुंदर उधाहरण आहे. अमृतेश्वराच दर्शन घेऊन ट्रेक ची सुरुवात होणार होती. रतनगड ट्रेक च हेच वैशिष्ट्य आहे. सुरुवातीलाच अमृतेश्वाराने दर्शन दिल्याने ट्रेक निश्चितच सुंदर होणार होता. रतनवाडी हे भंडारदरा backwater मधल एक टुमदार गाव. मंदिरामागुनच अमृतवाहिनी म्हणून\ओळखली जाणारी प्रवरा नदी खळखळत जाते.

नदीच्या काठाकाठाने ट्रेकला सुरुवात केली. नदीच पात्र ३/४ वेळा पार कराव लागत. डोंगराच्या बंधाबंधाने केलेली भातशेती आणी नागमोडी वळणे घेत वाहणारी प्रवरा मन प्रसन्न करत होती. चालताना मागे केलेल्या रतनगड night ट्रेक ची आठवण येत होती. सूर्य वर आल्याने चालताना चढावर धाप लागत होती. २/३ stop घेत घेत कात्राबाई कडे जाणार्या point कडे आलो. इथून वर जाणारा रस्ता शीडी मार्गे रतनगडा वर जातो. आम्ही रतनगड बायपास करून कात्राबाई चा रस्ता धरला. थोड पुढे आल्यावर २ मोठे कुंड दिसतात. हे ठिकाण प्रवरेचा प्रतीकात्मिक उगम म्हणून ओळखले जाते. 
या पुढे पूर्णपणे आमचा pilot ट्रेक सुरु होणार होता.
 

No comments:

Post a Comment