Wednesday, 15 October 2014

रतनगड ते हरिश्चंद्रगड भाग २

कुमशेत हून पुढे. . . . 

सकाळी लवकरच उठलो. गावातल्या बायकांची झर्यावर पाण्यासाठी लगबक सुरु होती. आम्ही आमच आवरून घेतल. आजीकडे चहा मारला आणी नाश्ता पेठेची वाडी करायचा ठरवून नीघालो. आजच आम्हाला पेठेचीवाडी आणी पाचनई एवढच माहीत होत. अजून एक गोष्ट ब्रिटिशांनी त्यावेळी साम्रद गावा पासून पाचनई पर्यंत पायवाट रस्ता बनवलेला त्याचे milestone दगड अजून आहेत. काल पासून मी तेच शोधत होतो. पण अजून भरपूर surprises होती आमच्या रस्त्यात. 
 
मुळा नदी

 कुमशेत हून शिरपुंजे कडे जायचा रस्ता पकडायचा आणी वाटेत उजवी कडे टेकडी वर जायचं. टेकडीवर आलो. डाव्या बाजूला घनचक्कर दिसत होता. 
Milestone pic courtesy Amey
या टेकडीवरच तो दगड भेटला. SAMRAD १२ आणी PACHNAI ६. दगडाची रचना बघून तो ब्रिटिशानी च केला असेल असे दिसून येते. तीथे थोडी फोटोग्राफी झाली. 

पुढे अजून अचंभित करणारे ठिकाण आमची वाट बघत होते. मुळा नदीची Valley. टेकडीवरून कडेला आलो तर खाली मुळा नदी वाहत होती. हिरवी गच्च भरलेली Valley आणी उथळ पाण्याने वाहणारी मुळा. दृश्य अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे होत. आम्ही लगेच खाली निघालो. खाली मुळेला दुसर्या बाजूने अजून एक ओढा येउन मीळत होता. हे Location एकदम Perfect होत. 
मी पहिलेल एक सुंदर ठिकाण. शहरापासून दूर शांत निवांत आणी बेछूट झालेल्या पर्यटकांपासून Totally Unspoiled. त्या नदी किनार्याने पुढे निघालो. नदीत छोटे छोटे धबधबे आणी रांजणखळगे होते. पुढे दुसर्या टोकाला अजून तीकडच्या अंगाने येणारा ओढा मीळत होता. नवीन नवीन ठिकाणे Explore करण्यात हीच मजा असते. आपल्या कडची ठिकाणे ही सुंदर आहेत. तीथे अजून पैसे वाले पोहोचले नाही म्हणून तरी ती सुखरूप आणी त्याचं सौंदर्य टिकवून आहेत. 


दुसर्या संगमापाशी गावकर्यांनी छोटा बंधारा बांधून पाणी अडवलेला. त्या छोट्या बांधलेल्या तळ्यात सोनकळीची फुले मस्त बहरून आलेली. मांडलेल्या दगडातून पाणीही एका लयीत पडत होत. पुढच्या वेळी इथेच कॅम्पिंग करायचं हे केव्हाच फीक्स झालेला. पाय नीघत नव्हता पण पाचनई हून १० वाजेची राजूर ची बस पकडायची होती. 

समोरची टेकडी चढून पेठेची वाडी ला आलो. भूक लागलेली. इथे मंदीरात बसून शेव कुरमुरे फरसाण मीक्स करून भेळ केली. 
दरवाज्या वरचे नक्षी काम
 इथून पुढे proper गाडी रस्ता आहे. त्या रस्त्याने चालताना वाटल आता काय संपला ट्रेक. पाचनई पर्यंत हाच रस्ता धरायचा. पण कोणास ठाऊक सह्याद्री कडे नेहमीच देण्या सारख असत. भटक्यांसाठी त्याची ओंजळ नेहमीच भरलेली असते. समोर एक छोटासा किल्ला आहे. त्याला वळसा घालून आम्ही पलीकडे आलो. समोर रस्ता बघीतला तर तो फार वळसा घेत जात होता. बरोबर जाणार्या गुराख्याला रस्ता विचारला तर तो म्हणाला हे इथून खाली उतारा अर्ध्या तासात पाचनई. अगदी हौस म्हणून आम्ही डोंगराची वाट धरली आणी दरीत उतरलो. परत झाड बाजूला सारत रस्ता कापायला लागलो. तो भीडू तर गुर चारायला निघून गेला. आता रस्ता शोधण्याची पाळी आमच्यावर आलेली. त्याचा माहीती प्रमाणे ओढा cross करायचा होता. थोड पुढे आलो तस ओढा आला. मग काय परत विसावा, कॅमेरा तर बाहेर निघणारच होता. डोंगराच पाणी पोटभर पीलो आणी पुढे निघालो. Pilot ट्रेक करताना रस्ता शोधता शोधता अचानक अश्या ठिकाणी येतो की आपण कधी ऐकल नव्हत आणी विचारही केला नसतो. 



आम्ही असच शोध घेत असताना एका बाजूला खाली उतरलो तर आमच्या समोर एक मोठ तळ आणी त्या पुढे ३ धारेत विभागलेला एक सुंदर धबधबा. आमच्या प्लान मध्ये हे नव्हतच. आम्ही क्षणात पाचनई, १० वाजेची बस , चुकलेला रस्ता सगळ विसरलो आणी म्हटलो की यार एक डुबकी तो बनती हे. आजची अंघोळ ही बाकी होती. तळ जास्त खोल नव्हत पण त्यात पोहू शकत होतो. पोहत पोहत धबधब्या पर्यंत आलो. पाण्याचा force खूप होता. त्याचा खाली उभ राहील तर अंग अगदी शेकून निघत होत. Natural Massage. तीथे मनसोक्त पोहन झाल. आणी अर्थात फोटो. ट्रेक सुरु झाल्यापासून कपडे तेच होते. घामाचा सुवास येत होता. इथेच कपडे बदलले. आणी वर आलो. आम्ही जीथून खाली गेलो तीथूनच एक सरळ रस्ता जात होता. तीकडे गेलो. खालच्या धबधब्याला जाणारा झरा लागतो. त्या झर्याकडे बघून वाटत नव्हत खाली इतका सुंदर नजारा असेल. त्या रस्त्याने वर आल्यावर एक पठार लागत. ते चालून गेल्यावर पुढे माणसांचे आवाज येत होते. तीथे परत हाका हाकी झाली. त्यांनी आम्हाला बघीतल आणी बरोबर रस्ता दाखवला. तीथून अगदी १०
मिनिटावर पाचनई होत. १२ वाजलेले. आमची बस तर गेलीच होती. तीथल्या हॉटेल मध्ये जंगलातल्या रानमेव्याचा अर्थात करवंद आणी जम्भूलाचा juice घेतला. 

सगळे ट्रेक भीडू relax होत होते. समोर हरीश्चंद्रगड होता. केदारेश्वर आणी कोकणकडा खुणावत होत पण या प्लान मध्ये ते include नव्हत. मागे बघीतल तर सह्याद्री ची अफाट range दीसत होती. आम्ही चालून आलेली रांग. रतनवाडी . . . रतनगड … कात्राबाई करत , कुमशेत पेठेची वाडी . . . मुळा नदी आणी मग पाचनई. एक मस्त range ट्रेक झालेला. आता घरची चाहूल लागलेली. लवकर पोहोचायचं होत कारण उद्या office होत. तीथे राजूर पर्यंत जायला जीपची Inquiry केली. दुसर काही साधन नसल्याने आम्हाला special जीप करावी लागली. त्यातून जाताना असाच एक मनात विचार आला की काल पण शेंडी ते रतनवाडी special जीप आणी आज पण. TTMM असलेला हा budget ट्रेक होता, पण त्यात कात्राबाई ने आमच्या खीशाला चांगलीच कात्री लावली होती. तरी गाठीला तीने एक मस्त अनुभव आणी एक perfect weekend दीला. 
कात्राबाई पास अगदी मस्त. . . .

No comments:

Post a Comment