Wednesday, 15 October 2014

कात्राबाई पास

रतनगड हून पूढे.


इथून पुढचा रस्ता कोणालाही ठाऊक नव्हता. या पूढची माहिती सगळी ऐकीव होती. Pilot ट्रेक ची एक मजा असते. ग्रूप मधले सगळे रस्ता शोधण्यासाठी डोक लावत असतात आणी त्यांचा कडचे Intelligent कौशल्य पणाला लावत असतात. तसा हा रस्ता चांगलाच मळलेला आहे. वाटेत भरपूर पायवाटा येतात. पण आपण उजव्या बाजूची वाट सोडायची नाही. हा रस्ता अग्निबाण सुळक्याला वळसा घालून जातो. 

मागे वळून बघीतल तर रतनगड, खुट्टा, AMK, आणी कळसुबाई range दिसत होती. आता कात्राबाई च जंगल सुरु झालेलं. पावसामुळे वाटेत भरपूर झाडे उन्मळून पडले होते. एका झर्या पाशी विश्रांती थांबा घेतला. पाण्याचा बाटल्या होत्या आमच्या कडे. पण ट्रेकर ची तहान ही फक्त अशा झर्यांच्या पाण्यानेच भागते.  येताना फळांचा जीन्नस आणला होता. आमच्या मागून एक आजोबा येत होते. त्यानाही आमच्या खाऊगल्लीत सामाऊन घेतल. त्यांच्याशी थोडी रस्त्याची विचारपूस केली आणी पुढे नीघालो. जस जस आम्ही खिंडी कडे चढत जात होतो तस जंगल फार दाट होत चालल होत.
करवी
आम्ही अग्निबाण सुळका क्रॉस करून आलो होतो पण दाट झाडीमुळे काहीच कळत नव्हते. कात्राबाईच घनदाट जंगल आतापर्यंत ऐकून होतो ते आता प्रत्यक्षात अनुभवत होतो.

ट्रेक सुरु होऊन ४ तास झालेले. खिंडीजवळ पोहोचत आलो होतो. इथले सह्याद्रीचे कडे आणी डेरेदार झाड बघून धडकीच भरत होती. इथून झिग zag करत रस्ता सुरू झाला की समझायचं खिंड जवळ आली. रस्त्याने जंगली प्राण्याची विष्ठा दिसली. कोणाची होती काही समझले नही पण core जंगल असल्याने बिबट्याची भीती होतीच. मी ती खिंड चढू लागलो. थकवा जाणवत होता आणी भूकही लागली होती. पण तीथे थांबणे शक्य नव्हते. कारण जंगली प्राण्याची भीती होतीच आणी घनदाट रस्ता काही संपत नव्हता. तो चढून वर आलो. सह्याद्रीतला नीसर्ग कसा क्षणात रूप बदलतो याचा अनुभव भटकताना नेहमी येतो. खिंडीत घनदाट झाडी होती. आणी वरती Daughter of Sahyadri म्हणून ओळखली जाणारी कारवी च अख्ख रान होत. पूर्ण  पठार कारवी ने भरून होत. अगदी हिरवागार पट्टा दिसत होता. 


त्या करवीतून रस्ता शोधत शोधत पूढे नीघालो. आता कात्राबाईच मंदीर शोधायचं होत. मागे वळून पाहील तर अख्ख भांडारदरा जलाशय आणी अफाट सह्याद्री पसरलेला होता. तीथून Bird Eye View भेटत होता. डाव्या बाजूला अग्निबाण रतनगड आणी रतनवाडी यांचा मागमूसही दिसत नव्हता. खूप मोठा पट्टा cover झाला होता. कारवी च्या झुडपातून बाहेर आलो. इथे मला पहिल्यांदाच दोन्ही प्रकारची कारवी दीसली. Baby कारवी जे छोटास झुडूप असत आणी नेहमीची करवी जी जवळ जवळ १०फूट उंच असते. 

उजव्या बाजूला एका झाडाच्या शेंड्याला उन्हा पाण्याने आणी बोचर्या हवेने निर्विकार झालेला भगवा फडकताना दिसला. तेच हे कात्राबाईच मंदीर. इथून खाली उतरताना ३ रस्ते लागतात मधला खाली \कुमशेत ला जातो आणी उजवा कात्राबाई मंदिर आणी कात्राकड्या वर जातो. मंदिराकडे आलो आणी पाठीवरच ओझ झटकल. 


कात्राबाई   

झाडाच्या बुंध्याला शेंदूर फासलेला, ४/५ दगड व्यवस्थीत रचलेले आणी कोण्या एका मूर्तीकाराने दगडातून घडवलेली कात्राबाई. मन अगदी प्रसन्न झाल. दिवाबत्तीची केलेली छोटीसी सोय. आणी गावकर्यांनी देवीची खाणा नारळाने भरलेली ओटी. देवी साठी बांधलेली हिरव्या बांगड्याची चूडी. कोण्या भटक्याने मंदिरासाठी वाहीलेले १/२ रुपयाचे नाणे. आणी मंदीर ओसरीवर बसून अंगावर घेतलेला सह्याद्रीचा भन्नाट वारा. कूठे तरी वाचलेलं मंदिराला देवपण हे तीथल्या वातावरणाने येत. ऐन नवरात्रीत कात्राबाई च्या अश्या दर्शनाने मन भरून आल.  
नेहमी मी मंदीरात जायचं टाळतोच पण अश्या ठीकाणी आल्यावर दोन क्षण तरी विसावा घेतो. काही तरी असत जगात ज्याला आपण देव म्हणतो. आणी अश्याच ठीकाणी निसर्गाच्या त्या शक्ती जवळ आल्याचा भास होतो. 

बाहेर आलो आणी जोरात शिट्टी घुमवली. सवंगड्यांची यायची वाट बघत होतो. एकमेकांना हाक हकी झाली. सगळी मंडळी जमा झाल्यावर कात्राबाई सोबतच जेवण उरकल. सचिन ने घरून डबा आणलेला होता. आम्ही चौघ लगेच तुटून पडलो. ओसरीवर ची झालेली घाण लगेच झाडून काढली. time खूप झालेला म्हणून कात्रा कडा cancel केला. 
मधला रस्ता पकडून उतरायला सुरुवात केली. हा रस्ता वळण घेत घेत फार कडयाने जातो. आता समोर कुमशेत चा कोंबडा दिसायला लागला होता. रात्री वस्ती साठी कुमशेत गाठायचं होत. या बाजूला पण कडे कपार्यातून झरे वाहतच होते. अशाच एका झर्यावर refresh झालो. खाली आलो तस भात शेती लागली. 

 इथून सरळ रस्ता होता. उजव्या बाजूला आजोबा डोंगर खूणावत होता. वाटेत गुर चारायला आलेल्या आजींशी गप्पा मारल्या. त्या कुम्शेतच्याच. सोनाबाई त्याचं नाव. त्यांनी गावाचा रस्ता दाखवला. आम्ही शाळेत पोहोचून bags उतरवल्या. 



सूर्यास्ताची वेळ आलेली. दिवसभर सोबत असणाऱ्या सुर्यानारायानाला राम राम म्हणून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. 

Dinner चा मेनू होता Maggy. चूल बनवायची होती. काम वाटून घेतली. एकाने लाकड गोळा करायची एकाने झर्यातून पाणी आणायचं आणी एकाने सामानाची जुळवाजुळव करायची. आमची Maggy बघायला आज्जी बाई हि आल्याहोत्या. कोणास ठाऊक त्यांना कौतुक ही वाटत होत. त्यांनी नंतर आम्हाला घरातून भातही बनून आणून दिला. त्यांच्याशी आमची चांगलीच मैत्री झालेली. त्यांच्याशी मस्त गप्पा रंगल्या होत्या. जेवण झाल्यावर शेकोटी पाशी शेकत बसलो. रात्री चांदण मस्त पडलेला. चांदण्यांनी भरलेल्या आकाशात मस्त एक चक्कर मारली. आणी थोड्या वेळाने आम्ही शाळेच्या आवारात गुडूप झालो. 
आता उद्याचा प्रवास होता पेठेची वाडी हून पाचनई

No comments:

Post a Comment